iphone (Photo Credits: File Photo)

2021 मध्ये अॅपल कंपनी पूर्णपणे वायरलेस आयफोन  (Apple Wireless iPhone) लॉन्च करणार आहे, अशी माहिती टेक अॅनालिस्ट मिंग-ची क्योने (Analyst Ming-Chi Kuo) आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. आतापर्यंत अॅपलमध्ये चार्जिंग पोर्ट म्हणून अॅपलमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळत आले आहे. पंरतु, आता आता कंपनी संपूर्णपणे वायरलेस फोनच्या टेक्नॉलॉजीचा फोन लाँच करणार आहे.

अॅपल कंपनी आता हायस्ट एंड आणि हाय एंड मॉडलमध्ये थोडे बदल करणार आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये अॅपच्या सर्वात वरच्या मॉडेलची विक्री जास्त होईल. 2021 मध्ये अॅपलचे आयफोन मॉडेलवगळता आयफोनच्या टॉप-एंड मॉडल्समध्ये लाइटनिंग पोर्ट नसेल. हा आयफोन संपूर्णपणे वायरलेस असेल. तसेच अॅपल 2020 मध्ये एकूण 5 आयफोन बाजारात आणू शकते, असे क्योने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. (हेही वाचा - Top Politics Handles In India 2019: ट्विटर वर यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा; स्मृती इराणी, अमित शहा सह ठरले हे 10 प्रभावी राजकारणी मंडळी!)

या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी लाँच होणाऱ्या अॅपल मॉडल्समध्ये एक 6.7 इंच हाय-एंड आयफोन, दोन 6.1 इंच आयफोन आणि एक एंट्री लेवल 5.4 इंच आयफोन असणार आहे. या सर्व फोनमध्ये 6 गीगाहर्ट्ज आणि 5 जी एमएम वेव सपोर्ट असणार आहे. 2020 मध्ये लाँच करण्यात येणाऱ्या आयफोनमध्ये युजर्सना मोठ्या प्रमाणात अपडेट मिळणार आहेत.