Top Politics Handles In India 2019 | Photo Credits: File Photo

येत्या 20 दिवसांमध्ये 2019 ला अलविदा म्हटलं जाणार आहे. दरम्यान आज लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने वर्षभरातील राजकीय क्षेत्रातील प्रभावी राजकीय मंडळींच्या ट्विटर हॅन्डलची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह स्मृती इराणी, ममता बॅनर्जी, प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2019 दरम्यान ट्विटरवर युनिक ऑथर्सकडून ट्वीटरवर करण्यात आलेल्या चर्चेमधून हे रॅकिंग जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे 'हे' ट्विट ठरले 'गोल्डन ट्विट ऑफ द ईअर'; ज्याला मिळाले 4 लाख 20 हजार लाइक्स, वाचा सविस्तर.

राजकीय क्षेत्रातील प्रभावी पुरूष नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर राहुल गांधी, अमित शहा, अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ, पियूष गोयल, राजनाथ सिंह, अखिलेश यादव, गौतम गंभीर यांच्यासह नितीन गडकरींना स्थान मिळाले आहे. तर प्रभावी नेत्या स्त्रियांमध्ये स्मृती इराणी अव्वल ठरल्या आहेत. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमन,ममता बॅनर्जी, प्रियंका चतुर्वेदी, अल्का लांबा, मायावती, मेहमुबा मुफ्ती आणि आतिशी या आपच्या नेत्याचा समावेश आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट यंदा गोल्डन ट्वीट ठरले आहे. ‘‘ सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत ।’’ उन्होंने कहा,‘‘ हम साथ मिलकर बढ़ेंगे, साथ मिलकर समृद्ध बनेंगे और साथ मिलकर ही एक मजबूत एवं समावेशी भारत का निर्माण करेंगे।’’असे ट्वीट पंपप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.