Great Indian Sale : ऑनलाईन कंपन्यांनी शॉपिंगच्या विश्वात क्रांती आणल्यानंतर, अॅमेझॉन (Amazon) ही कंपनी अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. ग्राहकांना आकर्षित करू घेण्यासाठी अॅमेझॉनने वेळोवेळी अनेक ऑफर्स, सेल यांचे आयोजन केले. आताही अॅमेझॉन यावर्षातला पहिला बंपर सेल घेऊन येत आहे, 20 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान ग्रेट इंडियन सेल (Great Indian Sale)चे आयोजन करण्यात येणार आहे. प्राइम मेंबर्सना 19 जानेवारी रात्रीपासूनच या सेलचा उपभोग घेता येईल. या सेलमध्ये एचडीएफसी बँके (HDFC Bank) च्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि EMI वर 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.
या आहेत बंपर ऑफर -
या सेलमध्ये तब्बल 10 करोड प्रोडक्ट्सवर कोणताही EMI लागू असणार नाही. जे ग्राहक पहिल्यांदा अॅमेझॉनवर खरेदी करत आहेत, त्यांना पहिल्या ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी दिली जाईल. फॅशन विभागातील गोष्टींवर तब्बल 80 टक्के सूट मिळणार आहे. पुरुषांच्या 25,000 पेक्षा जास्त गोष्टींवर ही सूट मिळणार आहे. महिलांसाठीही 20,000 पेक्षा जास्त गोष्टीवर सूट मिळेल. यासोबत इतर 30,000 गोष्टींवर 60 टक्के सूट मिळणार आहे. यामध्य वॉलेट, बॅग यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
टीव्ही आणि एसीवर बंपर सवलत -
या सेलमध्ये पुस्तके आणि मनोरंजन विभागावर 60 टक्के सूट दिली जाणार आहे. टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर 60 टक्के सूट मिळेल. ठरवीक टिव्हीवर 40, 000 हजारपर्यंत सूट मिळू शकते, तर वॉशिंग मशीनवर 8000 पर्यंत सूट मिळू शकते. यासोबत एसीवर तब्बल 25 हजारपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
स्मार्टफोनवर खास ऑफर -
या बंपरसेलमध्ये स्मार्टफोनवरदेखील अनेक ऑफर देण्यात येणार आहेत. या ऑफरमध्ये वनप्लस 6T, शाओमी रेडमी Y2, हुआई नोवा 3i, ओनर 8X, व्हीवो V9 आणि आयफोन X सोबत इतर अनेक फोन शामिल आहेत. शिवाय, लॅपटॉप, हेडफोन, हार्ड ड्राइव्ह आणि कॅमेरासोबत इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींवर 60 टक्के पर्यंत डिस्काउंट मिळेल.