Amazon Prime Video युजर्सला आता अॅपच्या माध्यमातून आपला प्रोफाइल फोटो बदलता येणार आहे. कारण Amazon Original फिल्म आणि शो मधील पॉप्युलर कॅरेक्टरपासून प्रेरित प्रोफाइल इमेज लावण्याची सुविधा देणार आहे. काही नवे प्रोफाइल फोटो ऑप्शनमध्ये The Marvelous Mrs. Maisel आणि The Boys चे मदर्स मिल्क सारखे कॅरेक्टरचा समावेश असणार आहे. ही सुविधा भारतासह सर्व ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आल आहे. त्यामुळे तुमच्या प्रोफाइल पेजवर एडिट बटणावर टॅप केल्यानंतर आता इमेज बदलली जाणार आहे.कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये नव्या फिचरची घोषणा केली आहे. उपलब्ध कॅरेकटर्स लोकप्रिय फिल्म आणि टीव्ही सीरिज सीरिजमधील असणार आहेत.(Redmi Note 10S स्मार्टफोनचा Cosmic Purple कलर वेरिएंट भारतात लॉन्च; पहा फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
iOS, Android आणि Fire Tablet डिवाइसवर प्राइम व्हिडिओ अॅपवर प्रोफाइल इमेज बदलण्यासाठी प्राइम व्हिडिओ अॅपच्या होमवर खाली असलेल्या My Stuff ऑप्शनवर जा. येथे ड्रॉप-डाउन मेन्यू सुरु केल्यानंतर प्रोफाइल नावावर क्लिक करा. आता Manage Profile करा. आता तुम्हाला प्रोफाइल फोटो ठेवण्यासाठी काही इमेज दिसतील. Edit Profile करुन तुम्हाला आवडणारे कोणतेही कॅरेक्टर तुम्ही प्रोफाइल फोटो म्हणून ठेवू शकता.(Oneplus 9 RT: वनप्लस कंपनीचा आगामी OnePlus 9 RT स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता, पहा फोनची वैशिष्ट्ये)
प्राइम व्हिडिओ वेबसाइटवर युजर्स स्क्रिनच्या टॉप राइट आणि Who's Watching च्या पुढे असलेल्या प्रोफाइलच्या नावावर क्लिक करु शकता. आता Manage Profile ची निवड करा. Edit Profile ऑप्शनवर क्लिक करा आणि त्या प्रोफाइलची निवड करा ज्याची इमेज तुम्हाला लावायची आहे. प्रोफाइल इमेजच्या खालीच Change ऑप्शन आणि उपलब्ध लिस्टमधील कॅरेक्टर तुम्ही निवडू शकता. प्रोफाइलच्या फोटो बदल्यानंतर तो Save करण्यास विसरु नका.