जर तुम्ही अॅमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण अॅमेझॉन प्राइमने आपला 129 रुपयांचा आपला सर्वाधिक स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन ग्राहकांसाठी रोलआउट केला आहे. आरबीआयच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, रिकरिंग ऑनलाईन पेमेंट्ससाठी अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिफिकेशन (AFA) अप्लाय करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे महिन्याभराची प्लॅन सेवा बंद केल्यानंतर लगेच अॅमेझॉनकडे फक्त तीन महिने किंवा वार्षिक सर्विस होती. मात्र आता 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही अॅडिशनलसह लिस्टमध्ये पुन्हा उपलब्ध करुन दिला गेला आहे.(Airtel ची धमाकेदार ऑफर! 12 हजारांचा नवा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर मिळार 6000 रुपयांचा कॅशबॅक, जाणून घ्या अधिक)
Amazon Prime सब्सक्रिप्शन वेबसाइट सुरु केल्यानंतर आता तुम्हाला तीन ऑप्शन मिळणार आहेत. अॅमेझॉनने आता 129 रुपयांचा, 329 रुपये तीन महिना आणि 999 रुपयांचा वार्षिक प्लॅन उपलब्ध करुन दिला आहे. अॅमेझॉनच्या तीन महिन्यांचा प्लॅन यापूर्वी 387 रुपयांना विक्री केला जात होता. सब्सक्रिप्शन हे तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.
अमेझॉनने आपल्या FAQ पृष्ठावर नमूद केले आहे की 129 रुपयांचा मासिक प्लॅन फक्त बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केला जाऊ शकतो ज्याने रिकरिंग पेमेंटसंदर्भात RBI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. Amazonमेझॉनने पुढील सूचना येईपर्यंत Amazonमेझॉन प्राइमच्या मोफत चाचणीसाठी नवीन सदस्य साइन-अप बंद केले होते.