Amazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

ऑनलाइन शॉपिंग सेंटर अॅमेझॉन इंडियाने (Amazon India) आपल्या ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव उत्तम करण्यासाठी येत्या दिवसात हिंदी भाषेसह अन्य स्थानिक भाषांचा सुद्धा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत प्लॅटफॉर्मवर मराठी आणि बंगाली भाषा सुद्धा जोडली जाणार आहे. यापूर्वी अॅमेझॉन इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर तेलगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषा सुद्धा उपलब्ध करुन दिली होती.

अॅमेझॉन इंडियाने असे म्हटले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर स्थानिक भाषांसह भारतीय ग्राहकांना सोप्प्या पद्धतीने खरेदी करता येणार आहे. यामुळे ग्राहकांचा खरेदी करण्याचा अनुभव उत्तम होणार आहे. ग्राहकांना अॅमेझॉनच्या अॅन्ड्रॉइ़ड,iOS मोबाइल अॅप आणि डेस्कटॉप वर्जनच्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्या हवी ती भाषा निवडू शकतात. कंपनीने पुढे असे म्हटले की, ग्राहकांना अॅमेझॉनच्या अॅन्ड्रॉइड अॅप आणि वेबसाइटवर नेविगेट करण्यासाठी, प्रोडक्ट्स शोधणे आणि हिंदी किंवा इंग्रजी मध्ये आपल्या आवाजाचा वापर करुन कार्ट मध्ये वस्तू अॅड करण्यास सक्षम असणार आहे.(Flipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत)

अॅमेझॉन इंडियाचे डायरेक्टर किशोर ठोठा यांनी असे म्हटले की, स्थानिक भाषेत शॉपिंगच्या अनुभवांसह आमचे उद्दिष्ट ई-कॉमर्सच्या ग्राहकांना सुलभ आणि सुविधाजनक बनवणे आहे. प्रत्येक महिन्याभरात लाखो ग्राहक अॅमेझॉनच्या माध्यमातून खरेदी करतात. तर ग्राहकांच्या उत्तम अनुभवासाठी नवे फिचर्स सुद्धा कंपनीकडून लॉन्च केले जातात.

दरम्यान, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर ही काही भाषांचा सपोर्ट केला जात आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली भाषेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त लेखकांना Kindle मध्ये हिंदी, मल्याळम, मराठी आणि गुजराती भाषेत लेख पब्लिश करण्याची सुविधा सुद्धा दिली जात आहे.