Amazon India Great Republic Day Sale 2021: 20-23 जानेवारी दरम्यान अॅमेझॉन चा वर्षातील पहिला सेल; या प्रॉडक्ट्सवर मिळेल आकर्षक सूट
Amazon India Great Republic Day Sale 2021 (Photo Credits: Amazon India official site)

ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन इंडियाने 2021 च्या पहिल्या सेलची घोषणा केली आहे. Great Republic Day Sale असे या सेलचे नाव असून 20 ते 23 जानेवारी दरम्यान हा सेल सुरु राहणार आहे. प्राईम मेंबर्सं 24 तास आधीच म्हणजेच 19 जानेवारी रात्री 12 वाजल्यापासून सेलचा लाभ घेऊ शकतात. Great Republic Day Sale 2021 अंतर्गत अॅमेझॉन ब्रँडच्या प्रॉडक्ट्सवर 70 टक्के सूट देण्यात येत आहे. यात टीव्ही आणि फ्रिज यांसारखे अप्लायन्सेस, होम आणि किचन प्रॉडक्टस, कपडे, फुटवेअर यांसारख्या प्रॉडक्टसचा समावेश आहे.

या सेलमध्ये खरेदी करताना ग्राहकांना एसबीआय (SBI) क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट ईएमआय सह अधिकतर 10 टक्के इंस्टन्ट डिस्काऊंट दिला जात आहे. बजाज फिनसर्व ईएमआय कार्ड, अॅमेझॉन पे, आयसीआयसीआय (ICICI) क्रेडिट कार्ड, अॅमेझॉन पे लेटर चा वापर करुन नो-कॉस्ट ईएमआय आणि डेबिट, क्रेडिट कार्डचा पर्याय निवडू शकता.

ग्रेट रिपल्बिक डे सेल अंतर्गत वनप्लस, सॅमसंग, शाओमी यांसारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर, इलेक्ट्रोनिक बँड HP, Lenovo, Mi, JBL, BoAt, Sony, Samsung, Amazfit, Canon, Fujifilm आणि LG, Bosch, Samsung, Whirlpool यांसारख्या होम प्रॉडक्ट्सवर आकर्षक डिल्स देण्यात येणार आहेत.

या सेल अंतर्गत OnePlus 8T, Redmi Note 9 Pro Max, iPhone 12 Mini, Samsung Galaxy M31 Prime आणि M51 या स्मार्टफोनवर 40 टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे. मोबाईल व्यतिरिक्त हेडफोन्स, केबल्स, पॉवर बँक्स, कव्हर्स आणि इतर मोबाईल अॅक्सेसरीजवर देखील डिस्काऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्यु्टर, स्मार्टवॉचेस, फिटनेस ब्रँड, ब्लूटुथ, स्पीकर्स, स्मार्ट डिव्हाईस आणि इतर प्रॉडक्टसवर देखील सूट देण्यात येणार आहे.

मोठ्या अप्लायन्सेस वर देखील रिपब्लिक सेलमध्ये डिस्काऊंट मिळणार आहे. अॅमेझॉनवर 6799 रुपयांपासून टीव्ही उपलब्ध असून नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडल्यास 3300 रुपयांच्या प्रती महिना ईएमआयवर तुम्ही टीव्ही खरेदी करु शकता. इको स्मार्ट स्पिकर्स आणि फायर टीव्ही स्टिक्सवर देखील 40 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. तर किंडल ई-बुक वर 3000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.