Alexa च्या माध्यमातून आता बिलाचे पैसे भरता येणार, जाणून घ्या कसे?
Amazon Alexa (Photo Credits-Twitter)

अॅमेझॉन (Amazon) कंपनीने भारतात आपल्या वर्च्युअल असिस्टेंट Alexa मध्ये नवे फिचर आणले आहे. आता पर्यंत Amazon Pay चे युजर्सला आता Alexa ला वॉइस कमांड देऊन बिलाचे पैसे भरता येणार आहेत. अॅमेझॉन पे च्या युजर्सला आपल्या Amazon Echo, Fire TV Stick सारख्या डिवाइसवर बिल्ड-इन अॅलेक्साला फक्त वॉइम कमांड देऊन Alexa, pay my mobile bill किंवा Alexa, pay my electricity/water/broadband) bill द्यावे लागणार आहे.

अॅलेक्सा मधील या नव्या फिचरमुळे आता बिल भरण्याचा आणखीनच वेळ वाचणार आहे. हे नवे फिचर पाणी, वीज, पोस्टपेड मोबाईल, कुकिंग गॅस, ब्रॉडब्रॅन्ड/DTH यांसारख्या कॅटेगरिला सपोर्ट करणार आहे. अॅमेझॉन इंडियाच्या Country Manager for Alexa Experiences and Devices, पुनीश कुमार यांनी असे म्हटले आहे की, नव्या फिचरमुळे अॅमेझॉन पे युजर्सला अॅलेक्सा प्रत्येक महिन्याला बिल भरण्यासाठी मदत करणार आहे. कंपनीचे हे फिचर फक्त भारतातच लॉन्च करण्यात आले आहे.(आता इंटरनेट शिवाय युजर्सला Google Assistant वापरता येणार)

 Alexa, Amazon Pay Users च्या रजिस्ट्रर अॅमेझॉन अकाउंटवर शिलक्क राहिलेले रक्कम रिट्रिव आणि पमेंट प्रोसेर करण्यापूर्वी ग्राहकाकडून कन्फर्मेशन घेणार आहे. ग्राहकांना त्यांनी पैशांबाबत केलेला व्यवहार सुरक्षित करण्यासाठी Alexa App वर वॉइल पिन इनेबल करु शकता. त्यानंतर अप्रुव झाल्यानंतर Alexa, Amazon Pay च्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करणार आहे. तसेच ग्राहकाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांवर नोटिफिकेशन येणार आहे.