Airtel Plans: 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 3GB डेली डेटा, स्ट्रीमिंग बेनेफिट्स आणि अनलिमिटेड कॉलिंग
Airtel (Photo Credits: File Photo)

टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) युजर्ससाठी नवे प्लॅन्स (New Plans) सादर करत असतात. एअरटेल (Airtel) ने देखील 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही प्लॅन्स सादर केले आहेत. यात डेली डेटा (Daily Date), अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling) आणि स्ट्रिमिंग बेनिफिट्स (Streaming Benefits) मिळत आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे प्लॅन्स आणि त्यात मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल... (Airtel Postpaid Plans: एअरटेलने ग्राहकांसाठी 'या' नवीन योजना केल्या जाहीर)

Airtel 349 Prepaid Plan:

जूनमध्ये एअरटेलने 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये काही नवीन फीचर्स सादर केले आहेत. एअरटेलच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये यापूर्वी 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB हाय-स्पीड डेटा दिला जात होता. या प्लॅनमध्ये आता दररोज 2.5GB डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. हा प्रीपेड प्लान अमेझॉन प्राइमच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असल्यामुळे अमेझॉन प्राइमची वैधता सुद्धा 28 दिवसांची असेल. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, विनामूल्य हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक, विनामूल्य ऑनलाइन वर्ग आणि फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक समाविष्ट करण्यात आला आहे.

Airtel 289 Prepaid Plan:

एअरटेलचा 289 रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो . या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. हा प्लान Zee5 प्रीमियमच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो, जो 28 दिवसांसाठी वैध आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमचे सदस्यत्व , विंक म्युझिक आणि शॉ अकादमीचे सदस्यत्व समाविष्ट आहे. ग्राहकांना मोफत हॅलो ट्यून आणि फास्टॅग व्यवहारांवर 150 रुपये कॅशबॅक देखील मिळेल.

Airtel 499  Prepaid Plan:

एअरटेलने 499 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील सादर केला आहे. या प्लॅनसोबत यूजर्सला डिस्नी + हॉटस्टार मोबाईलचा लाभ देखील मिळेल. डिस्नी + हॉटस्टार मोबाईलची किंमत 499 रुपये इतकी असल्याने हा प्लॅन यूजर्सना खूप परवडणारा आहे. यासोबतच यूजर्सना 3GB डेली डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल.

एअरटेल शिवाय जिओ, वोडाफोन आयडीया यांसारख्या कंपन्यांचे देखील विविध प्लॅन्स आहेत. त्यात देखील युजर्ससाठी खास बेनिफिट्स दिले जात आहेत.