खुशखबर! Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा
Airtel (Photo Credits: File Image)

टेलिकॉम कंपन्यांच्या (Telecom Company) स्पर्धेत टाऊन राहण्यासाठी दरदिवशी प्रत्येक कंपनी वेगळा प्लॅन, वेगळी स्कीम आणि भन्नाट ऑफर्स घेऊन बाजारात येत आहे. अशातच एक मोठं नबाव म्हणजे एयरटेलने (Airtel) आता ग्राहकांना मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) सोबतच अन्यही आकर्षक सुविधा देण्याचे ठरवले आहे. प्राप्त माहिती नुसार , एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 179 रुपयांचा एक नवा प्रीपेड प्लान (Prepaid Plan) आणला आहे. 28 दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना फ्री एसएमएस, डेटा आणि कॉलिंगसह एएक्सएचा लाइफ इन्शुरन्स दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 2 लाखांचा विमा इंश्युरन्स मिळणार आहे. लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) 18 वर्षे ते 54 वर्षे या व्यक्तींना मिळणार आहे.Flipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर

कंपनीने एअरटेलचा 179 रुपयांचा हा प्लान आज 19 जानेवारी पासून सुरू केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना Bharti AXA कडून 2  लाख रुपयांचा लाइफ इन्शुरन्स मिळणार आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांना या रिचार्जवर एअरटेल एक्सट्रीम अॅप आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिला जाणार आहे .या साठी कोणत्याही मेडिकल पेपर वर्कची आवश्यकता नसेल ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर लगेच इन्शुरन्स पॉलिसी फॉर्म मिळणार आहे.

Airtel ट्वीट

दरम्यान, यामध्ये पुढचा प्लॅन म्हणजे 279 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर ग्राहकांना 4 लाखांचा विमा मिळणार आहे. हा सुद्धा 28 दिवसांचा प्लॅन असून यात ग्राहकांना रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग दिली जाणार आहे.