TRAI च्या नव्या नियमांनुसार एअरलसेल (Aircel) टेलिकॉम कंपनीची सेवा 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. TRAI च्या नव्या नियमांचा फटका एअरसेल च्या ग्राहकांना बसणार आहे. एअरसेलचे सीम वापरणारे 7 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत या ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट केला नाही तर त्यांचे कार्ड कायमचे बंद होऊ शकते. इतकच नाही तर ते कार्ड पुन्हा सुरु देखील होणार नाही. असे झाल्यास तुमचा मोबाईल नंबरही बदलू शकतो. जी गोष्ट एअरसेल कार्डधारकांसाठी नक्कीच चांगली नाही.
2018 साली सुवातील एअरसेल कंपनीन त्यांच्या सुविधा ग्राहकांना देणं बंद केलं होतं. त्यांनंतर फेब्रुवारी 2018 रोजी ट्रायकडे युनीक पोर्टींग कोड देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. ज्याद्वारे ग्राहकांना आपला नंबर पोर्ट न करता इतर कोणत्याही एका कंपनीतील सेवेचा लाभ घेता येईल आणि त्यांची सेवा सुरु राहिल. मात्र ट्रायच्या अहवालानुसार 70 कोटी एअरसेल कंपनीचे ग्राहक आहेत. त्यांनी जर दिलेल्या तारखेपर्यंत त्यांचा नंबर पोर्ट केला नाही तर त्यांचं सिमकार्ड बंद होऊ शकतं. त्यानंतर तो नंबर पुन्हा तुम्हाला अॅक्टीवेट करता येणार नाही.
यासाठी काय कराल?
1. एअरसेल ग्राहकांना मॅन्युअली यूपीसी कोड जनरेट करावा लागेल.
2. त्यानंतर ग्राहकांना मॅन्युअली नेटवर्क सिलेक्ट करावा लागेल.
3. त्यानंतर मेसेज पर्याय निवडा तिथे PORT टाइप करा आणि 1900 नंबरवर मेसेज पाठवून द्या
4. जर तुमच्या फोनमध्ये बॅलेन्स नसेल तर हा मेसेज जाणार नाही.
5. मेसेज Send झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये तुमच्या नंबरवर यूनीक पोर्टींग कोड म्हणजेच UPC चा एक मेसेज येईल. Aircel च्या ग्राहकांसाठी 31 ऑक्टोबर पर्यंतच वेळ! मोबाईल नंबर पोर्ट न केल्यास 7 कोटी ग्राहकांचे नंबर होणार बंद
6. त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीमध्ये हा नंबर पोर्ट करायचा आहे त्याच्या प्रोवायडरच्या मदतीने तुम्ही तुमचा नंबर पोर्ट करु शकता.
7. या प्रक्रियेला नंबर पोर्ट होण्यासाठी साधारण 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो.
7-8 दिवसामध्ये तुमचा पोर्टेबल नंबरल सुरु होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या टेलिकॉम सर्विस प्रोवायडर किंवा ऑपरेटरसोबत संपर्क साधू शकता.