Aircel च्या ग्राहकांसाठी 31 ऑक्टोबर पर्यंतच वेळ! मोबाईल नंबर पोर्ट न केल्यास 7 कोटी ग्राहकांचे नंबर होणार बंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

तुम्ही एअरसेल (Aircel) किंवा डिशनेट व्हायरलेसचे युजर्स असाल तर 31 ऑक्टोबर नंतर तुमचा मोबाईल क्रमांक बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हांला तुमच्या फोनमध्ये ही सेवा कायम ठेवायची असेल तर 31 ऑक्टोबर पूर्वी आपला फोन क्रमांक दुसर्‍या सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर पोर्ट करणं आवश्यक आहे. ट्रायने (TRAI)  दिलेल्या माहितीनुसार, या मोबाईल कंपनीचे 7 कोटी युजर्स आहेत. जर मोबाईल युजर्सने मोबाईल क्रमांक पोर्ट केला नाही तर तो कायमचा बंद होणार आहे.

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायंस जिओनंतर अनेक कंपनी बंद पडल्या आहेत. 2016-17 बाजारात आलेल्या मोबाईल कंपनीने 2018 मध्ये आपली सेवा गुंडाळली. त्यानंतर एअरसेल ट्राय कडे पोहचली आहे. कंपनीने आपल्या युजरसाठी युनिक पोर्टिंग कोडची सुविधा आहे. 31 ऑक्टोबरला एअरसेल त्यांच्या ग्राहकांना सुविधा पुरवण्याची मुभा आहे. मात्र जे युजर्स या काळात मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत त्यांचा क्रमांक कायमचा बंद होणार आहे.

2018 साली एअरसेलने सेवा बंद केली. त्यावेळेस कंपनीकडे सुमारे 9 कोटी ग्राहक होते. तसेच ट्रायच्या अहवालानुसार, 28 फेब्रुवारी ते 31 ऑगसत दरम्यान 1.9 कोटी ग्राहकांनी त्यांचे नंबर पोर्ट करून घेतले आहेत. तर 7 कोटी ग्राहकांकडे अजूनही एअरसेलची सेवा आहे. या कंपनीने आपली सेवा बंद करण्यापूर्वी अनिल अंबानी यांच्या आरकॉममध्ये आपली कंपनी मर्ज करण्याबाबत विचार करत होते मात्र तांत्रिक कारणामुळे ते शक्य झालेले नाही.