5G स्मार्टफोन Honor 30s ने रचला इतिहास; अवघ्या 1 सेकंदात विकले गेले तब्बल 100 कोटी पेक्षा जास्त फोन
Honor 30S Smartphone (Photo Credits: Twitter)

ऑनरने (Honor) 30 मार्च रोजी आपला नवीन 5G स्मार्टफोन ऑनर 30s (Honor 30s) लाँच केला आहे. हुआवे अपडेट डॉट कॉमवर दिलेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. या फोनने सेलमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोनच्या पहिल्या सेलमध्ये केवळ 1 सेकंदामध्ये 100 दशलक्ष (सुमारे 107 कोटी) सेट्स विकले आहेत. असा अंदाज आहे की पहिल्या सेलमध्ये 37,000 ते 41,000 च्या दरम्यान ऑनर 30s स्मार्टफोन विकले गेले आहेत. आतापर्यंत क्वचितच एखाद्या फोनला असा प्रतिसाद मिळाला असेल.

ऑनरने मार्चच्या शेवटी Kirin 820G चिपसेटसह हा पहिला स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन काळ्या, निळ्या, हिरव्या आणि पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे. ऑनरच्या नवीन 5 जी फोनमध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. फोनचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. ऑनरच्या या फोनमध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या क्षणी हा फोन केवळ चीनमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात Realme ची मोठी घोषणा; फोनसह सर्व डिव्हाइसेसचा Warranty व Replacement कालावधी वाढवला)

कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर, फोनच्या मागील बाजूस आयताकृती क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स, 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि एलईडी फ्लॅशसह 2-मेगापिक्सलचा रूम सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

पॉवरसाठी, 4,000 एमएएचची बॅटरी ऑनर स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे, जी 40 डब्ल्यू रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन 2 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 2,399 युआन (सुमारे 25,800 रुपये) आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणार्‍या व्हेरिएंटची किंमत 2,699 युआन (सुमारे 28,900 रुपये) आहे.