5G Internet In India: भारत 5G इंटरनेट सर्विसच्या वाटेवर, आजपासून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात
5G Spectrum | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव आजपासून सुरू होत आहे. या लिलावात देशातील मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) सहभागी होणार आहेत. देशात 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.  5G  मुळे इंटरनेट स्पीड (Internet Speed) मेगाबाइटवरून (Megabyte) गीगाबाइटवर (Gigabyte) पोहचेल. यामध्ये 4G च्या तुलनेत 100 पट अधिक इंटरनेट स्पीड (Internet Speed) मिळेल. 5G  टेक्नोलॉजीचा (Technology) वापर केवळ स्मार्टफोनपुरता (Smartphone) मर्यादित राहणार नाही  तर घरातील स्मार्ट इलेक्ट्रीकल उपकरण (Smart Electrical Devices) देखील तुम्हाला 5G  ला कनेक्ट (Connect) करता येतील.

 

5G दूरसंचार सेवांसाठी स्पेक्ट्रम (Spectrum) लिलावात (Auction) एअरटेल (Airtel), अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. अंबानी आणि अदानी हे दोन उद्योगपती सहभागी होणार असल्यानं या लिलावाची उत्सुकता आणखीच वाढली आहे. अदानी ग्रुप आता 5G स्पेक्ट्रम लिलावात सायबर (Cyber) सुरक्षा,विमानतळ, बंदरे,लॉजिस्टिक, वीज निर्मिती, प्रसारण, वितरण आणि विविध उत्पादन ऑपरेशन्समध्ये (Operations) खाजगी नेटवर्क सोल्यूशन्स (Private Network Solution) प्रदान करण्यासाठी सहभागी होणार असल्याची माहिती अदानी ग्रुपकडून देण्यात आली आहे. तर मुकेश अंबानींचं रिलायन्स जियो देखील 5G च्या पार्श्वभुमिवर तयारीला लागलं आहे. भारतात 5G  सर्विस सुरु झाल्यास भारत जगातील 35 be देश असेल जिथे 5G  चा वापर करण्यात येईल. 5G  उत्सुकता संपूर्ण भारतीयांना लागली आहे.  तरी 2023 नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भारतात 5G  सर्विस सुरु होण्याची दाट शक्यता आहे. (हे ही वाचा:-Ambani Vs Adani : देशातील दोन बडे उद्योगपती आमने सामने येणार, आता टेलिकॉम इंडस्ट्रीत अंबानी विरुध्द अदानी?)

 

जगातील दुसरे सर्वात मोठे वायरलेस मार्केट (Wireless Market) भारतात (India) आहे. जगभरातील विविध देशात 5G नेटवर्क उपलब्ध असून भारतात देखील लवकरच 5G नेटवर्क (Network) सुरू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात 5G  सर्विसबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय यूजर्स 5G  सर्विसच्या प्रतिक्षेत आहे. पण  भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन आता भारतात 5G  इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात आजपासून 5G  स्पेक्ट्रमचा लिलाव (5G Spectrum Auction) होत आहे.