Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जेव्हा पासून ट्विटर एलॉन मस्क यांनी विकत घेतल आहे तेव्हा पासून ट्विटर या सोशल मिडीया प्लाटफॉर्मची रोज चर्चा होते. कधी ट्विटरचा नवा अपडेट, कधी ट्विटरचा वाद, ट्विटरची ब्लू टिक, ट्विटरचं सबस्क्रीपशन, ट्विटर मधील नोकर कपात अशा कुठल्या ना कुठल्या बाबीतून ट्विटर कायम चर्चेत असतं पण यावेळी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या या अॅक्शन नंतर भारतात खळबळ माजली आहे. ट्विटरकडून तब्बल ४८ हजार भारतीयांचे ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आले आहे. तरी ४८ हजार ट्विटर अकाउंटवर बंद घालण्यामागे नेमक कारण काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण याबाबत स्वत एलॉन मस्क यांनी ट्विट करत  संबंधीत माहिती दिली आहे. ट्विटरने एकूण 48 हजार 624 भारतातीय ट्विटर खात्यांवर  बंदी घातली आहे. ट्विटरवर नकारात्मक आणि भडकाऊ ट्विट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

 

ट्विटरने भारतात एकूण 48 हजार 624 खात्यांवर  बंदी घातली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या आणि भावना भडकवणाऱ्या पोस्टला आळा  बसावा, यासाठी ट्विटरने हे अकाउंट बॅन केल्याची माहिती मिळत आहे. लैगिक शोषण, नग्नता, दहशतवाद या संबंधीत पोस्ट करणारे अकाउंट ट्विटरवर चालणार नाही असचं काहीसं ट्विटरकडून दाखवून देण्यात आलं आहे. तरी एकाच देशातील तब्बल ४८ हजारांहून अधिक अकाउंट बॅन होण ही कमालीची बाब आहे. (हे ही वाचा:- Elon Musk Fails to Pay Rent: एलोन मस्क यांनी भरले नाही Twitter च्या कार्यालयाचे भाडे; कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या सविस्तर)

 

तरी आता पुढील काहीचं दिवसात ट्विटरवर ट्विट एडिट, ट्विटर डेटा मॉनिटायजेशन यासारखे नवनवीन ऑप्शन दिसुन येणार आहेत. ट्विटरचे मालक एलॉन मस्क झाल्यापासून ट्विटरमध्ये १८० अंशाचे बदल बघायला मिळाले आहेत. तरी पुढील काही दिवसांत ट्विटर आणखी काय नवे फिचर किंवा अपडेट्स घेवून येतो ह्याचा काहीच नेम नाही.