सौरव गांगुली यांच्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्यावर बीसीसीआय सोपवणार ही मोठी जबाबदारी?
Sachin Tendulkar (Photo Credits: Getty Images)

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Gangully) बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी विराजराम झाले आहेत. सौरव गागुंली यांच्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, अशा चर्चांनी उधाण आले आहे. युवा खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळाले तर, त्यांचे भवितव्य उज्वल्ल होऊ शकते. तसेच चांगल माणूस म्हणून हा खेळाडू समाजात राहू शकतो. यामुळे या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती केली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे.

भारताचे यशस्वी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती स्वीकारली होती. सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या कारकर्दीत उत्तम कामगिरी करुन चाहत्यांचे मन जिंकली आहेत. महत्वाचे म्हणजे, सचिन तेंडुलकर यांना आंतराष्ट्रीय क्रिकेटचा तब्बल 24 वर्षाचा अनुभव आहे. तसेच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ते मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा केली जात आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. पण ही गोष्ट नेमकी प्रत्यक्षात कशी आणणार आणि त्यानंतर या गोष्टीचे काय परिणाम होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे देखील वाचा- T20 World Cup 2020 : 'हे' 6 संघ विश्वचषक स्पर्धेसाठी ठरले पात्र

दैनिक जागरण यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर हे भारताचे युवा खेळाडू रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शुभमन गिल यांच्यासारख्या खेळाडूबरोबर सचिन आपला वेळ व्यतीत करुन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.