तिसऱ्या कसोटीपूर्वी Virat Kohli ने  Anushka Sharma सोबत घेतला Zero सिनेमाचा आनंद (Video)
Anushka Sharma and Virat Kohli (File Photo)

शाहरुख खान (Shah Rukh Khan), अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'झिरो' (Zero) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात शाहरुख खानने बाउआ सिंग ही अनोखी व्यक्तीरेखा साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रीया आल्या. 'झिरो' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कमाई किती?

अनुष्का शर्माचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) देखील हा सिनेमा पाहिला. विराट सध्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी विराटने अनुष्कासोबत 'झिरो' सिनेमाचा आनंद लूटला. त्यावेळेस त्यांना मॉलमध्ये स्पॉट करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना झाली होती.

यापूर्वी विराट कोहलीने अनुष्का शर्माचा सुईधागा सिनेमाही पाहिला होता. त्यावेळेस त्याने खास ट्विट करुन सिनेमातील स्टारकास्टचे कौतुक केले होते.

आता विराटला 'झिरो' सिनेमा कसा वाटला, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.