Zero box office collection day 1: 'झिरो' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कमाई किती?
अनुष्का शर्मा, शाहरुख खान,कैटरीना कैफ (Photo Credits: Instagram)

Zero box office collection day 1:  अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची भूमिका असलेला ' झिरो' (Zero) हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी सुमारे 3500  स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला ख्रिसमसच्या विकेंडवर सोलो रिलीज मिळावं म्हणून मराठी सिनेमा 'माऊली' च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आले होते. बॉलिवूडचा बादशाह या सिनेमात प्रमुख भूमिकेत असला तरीही या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफच्या या सिनेमातील कामाबद्दल समीक्षकांनीही कौतुक केले आहे. Zero Movie Review: Zero सिनेमातील अभिनयानंतर Katrina Kaif वर समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

पाहिल्या दिवशी कमाई किती ?

झिरो सिनेमाने पहिल्याच दिवशी सुमारे 20.14  कोटींचा गल्ला जमावला आहे. ट्रेड एनालिस्ट गिरीश जौहर यांनी पहिल्या दि वसाच्या कमाईचा आकडा हाती येण्या आधी हा सिनेमा सुमारे 25-27 कोटी कमावले असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र समिक्षकांसोबतच, प्रेक्षकांनीही या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

आनंद एल राय यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमामध्ये कॅटरिना एका हार्टब्रेक झालेल्या अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे, अनुष्का शर्मा दिव्यांग वैज्ञानिक साकारत आहे तर शाहरुख खान बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत आहे. सलमान खान, श्रीदेवी यांच्या भूमिका या सिनेमात कॅमिओ स्वरूपात आहेत. अजय - अतुल या मराठमोळ्या जोडीने या सिनेमातील काही गाणी संगीतबद्ध केली आहेत.