आयपीएल 2023 (IPL 2023) 31 मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. त्याचवेळी, क्रिकेटच्या या ग्रँड लीगपूर्वी टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. वास्तविक, कोहलीने आयपीएलपूर्वी आपले केस कापले आहेत. त्याचवेळी त्याच्या नवीन हेअरस्टाईलचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीझनमध्ये विराट कोहली नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसणार आहे.
आरसीबी कॅम्पमध्ये सामील होण्यापूर्वी आणि आयपीएलपूर्वी त्याने आपले केस कापले आहेत. याचा फोटो स्वतः विराटने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटच्या नव्या हेअरस्टाइलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विराटसोबत हेअरस्टायलिस्ट अलीमही त्याच्या फोटोत दिसत आहे. तर या फोटोमध्ये विराट त्याला जादूगार म्हणत आहे. हेही वाचा Women Maharashtra Kesari 2023: महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील स्पर्धकांची गैरसोय, वीज बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुलात अंधार
विराट कोहलीला हा नवा लूक देणारा अलीम हकीम हा प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आहे. अलीमने अनेक सेलिब्रिटींना नवा लूक दिला आहे. अलीम हे बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींशी संबंधित आहेत. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहलीचाही समावेश आहे. आजकाल विराट कोहलीची बॅट जोरदार बोलते आहे. तो अप्रतिम फॉर्ममध्ये धावत आहे. विराटचा फॉर्म पाहता यावेळी आरसीबी प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
आयपीएल 2023 साठी RCB संघ
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (क), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल