शाहिद अफरीदी आणि युवराज सिंह (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद अफरीदीच्या (Shahid Afridi) मदतीसाठी देणगी दिली, जेणेकरुन कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) त्रस्त तिथल्या  लोकांना मदत करता यावी. ट्विटरच्या माध्यमातून युवराजने माहिती दिली होती की तो अफरीदीची मदत करत आहे, जेणेकरून पाकिस्तानमधील गरजू लोकांना खाण्यापिण्याची सुविधा मिळावी. मानवता म्हणून दिलेली ही मदत काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने मांडली ज्यामुळे युवराजला सोशल मीडिया ट्रोलर्सचा सामना करावा लागला. अशा स्थितीत युवीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी हरभजन सिंह (Harbhajan Singh) यालाही आफ्रिदी फाउंडेशनच्या (Afridi Foundation) मदतीसाठी आवाहन केल्यामुळे ट्रोल केले गेले आहे. अनेक सेलिब्रिटी कोरोना व्हायरसविरूद्ध लढ्यात मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रत्येकजण त्यांच्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानमधील अफरीदीची स्वयंसेवी संस्था गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहे. अशा परिस्थितीत युवराजनेही त्याच्या फाउंडेशनला मदत करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले. (COVID-19: युवराज सिंह ने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिली शाहिद अफरीदीला साथ, SA Foundation ला मदत केल्याबद्दल नेटिझन्सकडून टीका)

आणि आता यांना प्रत्युत्तर देत युवीने निवेदन जाहीर केले ज्यात त्याने म्हटले,“सर्वात असुरक्षित व्यक्तींना मदत करणे प्रमाणातून कसे वाढवले जाते हे मला खरोखरच समजत नाही! आमच्या संबंधित देशातील लोकांना आरोग्य सेवा देऊन मदत करणे, हाच संदेश पोहचवणे माझा हेतू होता.कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी एक भारतीय आहे आणि मी नेहमीच ब्लीड ब्लू असेन आणि नेहमीच मानवतेसाठी उभा राहीन. जय हिंद." दरम्यान, युवराजने अफरीदी फाऊंडेशनला किती आणि कशी मदत केली हे अद्याप उघड झाले नाही.

यापूर्वी युवीने मदत म्हणून लिहिले की, "हा एक कठीण काळ आहे. या क्षणी गरज पाहणाऱ्यांची काळजी घेण्याची ही वेळ आहे. योगदान द्या, कोविड-19 विरुद्ध लढाईत मी शाहिद अफरीदी फाउंडेशनला मदत करीत आहे." यावर अफरीदीनेही त्याला प्रतिक्रिया दिली आणि त्याचे आभार मानले होते. अफरीदीने लिहिले की "माणूस म्हणून ही एक उदात्त पायरी आहे."