भारतीय क्रिकेटपटू  स्मृती मंधाना सह 88 खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा  पुरस्कार जाहीर, उदय देशपांडे यांना 'जीवन गौरव' देऊन करणार सन्मानित
Smriti Mandhana (Photo: Getty)

Shivchatrapati Awards 2017-18: भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील सांगली गावातील स्मृती मंधाना (Smriti Mandhana) मागील काही दिवसांपासून चर्चांमध्ये आहे. दमदार खेळामध्ये आयसीसी रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचलेली स्मृती आठवड्याभरापूर्वी फोर्ब्स इंडियाच्या यादीत झळकली आणि आता महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा 2017-18 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही (Shivchatrapati Award) पटकावला आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या पुरस्काराची घोषणा केली आहे.

17 फेब्रुवारी 2019 दिवशी राज्याच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचा वितरण समारंभ होणार आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये देण्यात येतील. यंदा एकूण 88 खेळाडूंचा सन्मान होणार आहे.

स्मृतीने 2018 पासून आतापर्यंत 15 एकदिवसीय सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. स्मृती महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार आहे.महाराष्ट्राची स्मृती मंधाना महिला क्रिकेटपटूंच्या ICC क्रमवारीत अव्वल

स्मृती सोबतच यंदा मल्लखांब हा खेळ जागतिक पातळीवर घेऊन जाणारे उदय देशपांडे यांचा जीवन गौरव देऊन सन्मान होईल. माऊंट एव्हरेस्ट, किलीमांजरो सारखी शिखरं सर करणाऱ्या प्रियंका मोहितेला साहसी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.