IPL 2022 PBKS vs GT: गुजरातचे प्लेऑफ टिकीट लांबणीवर, शिखर धवनचे अर्धशतक, Liam Livingstoneच्या झटपट खेळीने पंजाबचा 8 विकेटने विजय
PBKS vs GT

पंजाब किंग्जने (Punjab Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) 8 गडी राखून पराभव केला. IPL 2022 च्या 48 व्या सामन्यात शिखर धवनने (Shikhar Dhawan) पंजाबसाठी दमदार कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावले. तर भानुका रापाक्षेने 40 धावांची जलद खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचवेळी साई सुदर्शनने संघासाठी अर्धशतक झळकावले. या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ नाणेफेक हरला होता. पण त्याने सामन्यावर कब्जा केला. पंजाबसाठी जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन सलामीला आले. पण बेअरस्टो जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि एका धावेवर तो बाद झाला.

त्याचवेळी भानुका राजपक्षेने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने 28 चेंडूत 40 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.  धवनने 53 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. लिव्हिंग स्टोनने शानदार इनिंग खेळली. त्याने अवघ्या 10 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 8 गडी गमावून 143 धावा केल्या. यादरम्यान साई सुदर्शनने संघासाठी शानदार खेळी केली. त्याने 50 चेंडूत 65 धावा केल्या. त्याच्या नाबाद खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने 21 धावांचे योगदान दिले. साहाने 17 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला. हेही वाचा TATA IPL Playoffs and Women’s T20 Challenge 2022 Schedule: बीसीसीआयकडून IPLच्या प्ले-ऑफ आणि फायनलसह महिला T20 चॅलेंज 2022चे वेळापत्रक जाहीर

या व्यतिरिक्त एकही फलंदाज विशेष काही करू शकला नाही.  पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. त्याने 4 षटकात 33 धावा दिल्या. तर अर्शदीप सिंग, ऋषी धवन आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऋषीने 4 षटकात 26 धावा दिल्या.