IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG vs CSK) सामन्यानंतर आयपीएल 2024 (IPL 2024) च्या ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) शर्यतीत मोठा बदल दिसून आला आहे. झंझावाती शतक झळकावल्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) टॉप 2 मध्ये पोहोचला आहे, तर मुस्तफिजुर रहमानने (Mustafizur Rahman) पर्पल कॅपच्या (Purple Cap) शर्यतीत पुन्हा टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Points Table मध्ये मोठा फेरबदल, CSK टॉप 4 मधून बाहेर; LSG ने उडवून दिली खळबळ)
Here are the orange cap and purple cap standings after the 39th Match of IPL 2024
📸: IPL#IPL2024 #TATAIPL2024 #MI #CSK #RCB #KKR #GT #LSG #DC #PBKS #SRH #RR #IndianPremierLeague #orangecap #purplecap pic.twitter.com/zDtfzfSxr4
— SportsTiger (@The_SportsTiger) April 23, 2024
आयपीएल 2024 ऑरेंज कॅप सध्या विराट कोहलीच्या डोक्यावर बसली आहे. त्याने आरसीबीसाठी 8 सामन्यात 379 धावा केल्या आहेत. मात्र, ऋतुराज गायकवाडने 349 धावा केल्या असून त्यामुळे तो विराटच्या जवळ आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड आहे, ज्याने सनरायझर्स हैदराबादसाठी 6 सामन्यात 324 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर रियान पराग आहे, ज्याने 318 धावा केल्या आहेत आणि पाचव्या स्थानावर त्याच्या संघाचा कर्णधार संजू सॅमसन आहे, ज्याने 314 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2024 च्या पर्पल कॅपबद्दल बोलायचे तर, ती भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यापली आहे. त्याने 8 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलनेही तितक्याच विकेट घेतल्या आहेत. हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये तिसरा भारतीय आहे, ज्याने पंजाब किंग्जसाठी 8 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमानने 12 विकेट घेतल्या आहेत. जेराल्ड कोएत्झीने एमआयसाठी तेवढ्याच विकेट घेतल्या आहेत.