IPL 2022 RR vs KKR: राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 10 धावांनी विजय
RR vs KKR

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2022 च्या 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals ) कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders ) 10 धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा चौथा विजय आहे. त्याचबरोबर केकेआरचा हा चौथा पराभव आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 19.4 षटकांत सर्वबाद 210 धावांवर आटोपला. अनेक चढ-उतार असलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत थरार कायम होता. तत्पूर्वी, राजस्थानने पहिल्या डावातच मॅचविनिंग स्कोअर केल्याचे दिसत होते. पण श्रेयस अय्यर आणि अॅरॉन फिंचच्या शानदार फलंदाजीने केकेआरच्या बाजूने सामना फिरवला.

त्यानंतर 17व्या षटकात युझवेंद्र चहलने हॅट्ट्रिकसह एकूण चार विकेट घेत राजस्थानचा विजय निश्चित केला होता. मात्र त्यानंतर उमेश यादवने सामन्याची दिशाच उलटवली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. उमेशने अवघ्या 9 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 21 धावा केल्या.