Photo Credit -X

Rahul Dravid:भारताच्या पुरूष संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी T20 विश्वचषक विजयासाठी त्यांना देण्यात येत असलेला 2.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोनस नाकारला (Rahul Dravid Refused Bonus) आहे. टीमच्या सपोर्ट स्टाफच्या सर्व सदस्यांसाठी समान बक्षीस असावे, या उद्देशाने राहूल द्रविड यांनी 2.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोनस नाकारला. बीसीसीआयने विजयी भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

राहुल द्रविड यांच्या या कृतीमुळे त्यांची विनम्रता पुन्हा एकदा पहाया मिळाली. पुरुष संघातील सपोर्ट स्टाफच्या सर्व सदस्यांना समान बोनस बक्षिसे मिळतील याची खात्री करण्यासाठी राहूल द्रविड यांनी हा निर्णय घेतला.

बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह टीम इंडियाच्या सदस्यांसाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. खेळाडू आणि राहुल द्रविड यांना ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासह सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांना बोनस म्हणून २.५ कोटी रुपये मिळणार होते.

संघातील 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सपोर्ट स्टाफ सदस्यांना 2.5 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तर निवडकर्ते आणि प्रवासी राखीव सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी गुरुवारी, 4 जुलै रोजी मुंबईत विजयी परेडनंतर संघाला बक्षिसाची रक्कम सुपूर्द केली.

दरम्यान, राहुल द्रविड यांनी याआधीही त्यांच्या कृतीतून चाहत्यांची मने जिंकली आङेत. 2018 मध्ये, भारताने U19 पुरुष विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर, BCCI ने तत्कालीन प्रशिक्षक द्रविडसाठी 50 लाख रुपये, त्याच्या संघातील इतर सदस्यांसाठी 20 लाख रुपये आणि खेळाडूंसाठी 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. द्रविडने भारतीय क्रिकेट बोर्डाला बक्षीसाची रक्कम कोचिंग स्टाफमध्ये समान रीतीने विभागण्यास सांगितले होते. त्यावेळीही बोर्डाने त्यांची विनंती मान्य केली होती.

BCCI ने मंगळवारी, 09 जुलै रोजी पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती केली. साडेतीन वर्षांचा करार करण्यात आला आहे.