Rafael Nadal (Photo: Getty Images)

अमेरिकन ओपनच्या (US Open 2019) अंतिम सामन्यात स्पॅनिशचा राफेल नदाल (Rafael Nadal) आणि रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा (Daniil Medvedev) यांच्यात चांगली झुंज पाहायला मिळाली आहे. दरम्यान, अंतिम सामन्यात (Final Match) नदाल आणि मेदवेदेव यांच्यात सुमारे 5 तास सामना सुरु होता. मात्र, शेवटच्या निर्णायक फेरीत राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत यूएस ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नदालला पाचव्या नामांकित डॅनिल मेदवेदेववर अत्यंत संघर्षपूर्ण विजय मिळवला.

अमेरिकन ओपन स्पर्धेत स्पॅनिश राफेल नदाल आणि डॅनिल नदाल यांनी उत्तम कामिगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र, या लढतीत नदाल याने मेदवेदेवचा 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा पराभव करत अमेरिकन ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले. नदालने अमेरिकन ओपन स्पर्धेचे चौथे विजेतेपद मिळवले आहे. तसेच हा किताब पटकावल्यानंतर रॉजर फेडररच्या (Roger Federer) पुरुषांच्या विक्रमापासून तो अवघ्या एका ट्रॉफीपासून दूर आहे. दुखापत झालेला नदाल याने पुनरागमन करताच 12वा फ्रेंच ओपन (French open) किताबवर त्याचे नाव कोरले होते. सध्या नदाल हा विक्रमापासून केवळ एक विजय दूर आहे. महत्वाचे-US Open 2019: सेरेना विल्यम्स चे स्वप्न भंग, 19 वर्षीय बियान्का अँड्रेस्कू ने यूएस ओपन फायनलमध्ये पराभव करत रचला इतिहास

यू एस ओपन यांच्या अधिकृत अकांउटवरुन शेअर केलेले ट्विट-

रशियाचा खेळाडू मेदवेदेव याने वयाच्या 23व्या वर्षी ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत पोहचला होता. गेल्या 6आठवड्यापासून तो उत्तम कामगिरी बजावत होता. त मेदवेदेव याने त्याच्या खेळीत उत्कृष्ट असा बदल बघायला मिळाला आहे. त्याने वॉश्गिंटन आणि कॅनडामध्ये उपविजेतेपदानंतर त्याने सिनसिनाटी स्पर्धेचे जेतेपद आणि आता अमेरिकन ओपनमध्ये अंतिम सामन्यापर्यंत तो पोहोचला आहे. मात्र, अमेरिकन ओपनमध्ये नदालकडून त्याचा पराभाव झाला. पुरुष ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मेदवेदेव पहिलाच रशियन खेळाडू ठरला आहे.