US Open 2019: सेरेना विल्यम्स चे स्वप्न भंग, 19 वर्षीय बियान्का अँड्रेस्कू ने यूएस ओपन फायनलमध्ये पराभव करत रचला इतिहास

अमेरिकेच्या 23 ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यम्सचा यूएस ओपन च्या अंतिम सामन्यात 15 व्या मानांकित कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कूने पराभव करत इतिहास रचला आहे. 19 वर्षीय बियान्काने सेरेनाचा सरळ सेटमध्ये 6-3, 7-5 ने पराभव केला. या पराभवासह सेरेनाचा ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याची संधी गमावली.

US Open 2019: सेरेना विल्यम्स चे स्वप्न भंग, 19 वर्षीय बियान्का अँड्रेस्कू ने यूएस ओपन फायनलमध्ये पराभव करत रचला इतिहास
बियान्का अँड्रेस्कू (Photo Credit: Getty)

अमेरिकेच्या 23 ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यम्सचा (Serena Williams) यूएस ओपन (US Open) 2019 च्या अंतिम सामन्यात 15 व्या मानांकित कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कूने (Bianca Andreescu) हातून पराभव करत इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या ओपन महिला एकेरीच्या फायनलमध्ये 19 वर्षीय बियान्काने सेरेनाचा सरळ सेटमध्ये 6-3, 7-5 ने पराभव केला. यूएन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी बियन्का कॅनडामधील पहिली महिला खेळाडू आहे. सामन्यादरम्यान बिएन्काने सुरुवातीपासूनच सेरेनावर वर्चस्व राखले होते. या पराभवासह सेरेनाचा ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्ट (Margaret Court) च्या 24 ग्रँड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याची संधी गमावली.

सामना जिंकल्यानंतर बियान्का म्हणाली, "हे वर्ष जणू जणू स्वप्न पूर्ण झाले आहे." दरम्यान, यूएस ओपन जिंकणारी बियान्का दुसरी युवा खेळाडू ठरली आहे. तिच्याआधी रशियाच्या मारिया शारापोवा (Maria Sharapova) ने 2006 मध्ये यूएस ओपन जिंकण्याचा पराक्रम केला होता. युवा वयात ग्रँड स्लॅम जिंकणारी बियांका शारापोव्हानंतर दुसरी टेनिसपटू ठरली. रशियाच्या शारापोव्हाने वयाच्या 17 व्या वर्षी 2004 मध्ये विम्बल्डनचे जेतेपद जिंकले होते.

बियान्कापूर्वी कॅनडाच्या युजेनी बुशार्डने 2014 मध्ये ग्रँड स्लॅम फायनलमध्येही प्रवेश मिळवला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्यूड्रो यांनी बियान्का अँड्रेसकू चे ट्विटरवरून अभिनंदन केले. दुसरीकडे, 23 ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेनाचा फायनलमधील हा सलग चौथा पराभव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिला विम्बल्डनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 2018 मध्ये सेरेना अँजेलिक केर्बर आणि 2019 जुलैमध्ये सिमोना हलेप यांच्याकडून पराभूत झाली. पाचव्या क्रमांकाच्या युक्रेनच्या एलेना स्वितोलिनाला सेमीफायनलमध्ये सरळ सेटमध्ये 6-3, 6-1 ने पराभूत करून सेरेनाने दहाव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून आणि आपल्या जबरदस्त कामगिरीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2019 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).