पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढाई जिंकण्यासाठी देशासाठी प्रत्येक पाऊल उचलत आहेत. शुक्रवारी दुपारी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील 40 बड्या क्रीडा दिग्गजांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉलमध्ये क्रीडामंत्री किरेन रिजिजूही सहभागी झाले होते. या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर आणि धावपटू हिमा दास यांच्यासारख्या विविध क्रीडा क्षेत्रातील 40 बड्या खेळाडूंशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी कोविड-19 (COVID-19) चा सामना करण्यासाठी ‘संकल्प, सन्यम, सकरात्मक्त, सन्मान व सहयोग’ असे पाच मंत्र दिले. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2,000 च्या वर गेली असून अनेक राज्यांमध्ये दिवसागणित कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. व्हायरस प्रसारण साखळी तोडण्याच्या प्रयत्नात सध्या भारत (India) 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये आहे. (5 एप्रिल, रात्री 9 वाजता 9 मिनिटं; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला क्रीडापटुंनी दिली साथ, कोण काय म्हणाले पाहा)
एएनआयने पीएमओच्या हवालयातून दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान म्हणाले की, "खेळाडूंनी देशाचा गौरव केले आहे आणि आता देशाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे." या खेळाडूंच्या माध्यमातून पंतप्रधानांनी लॉकडाउन काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन देशातील जनतेला केले. दुसरीकडे, या लढाईत सामील झालेल्या आरोग्यसेवा कर्मचारी आणि पोलिस कर्मचार्यांना त्यांच्या नि:स्वार्थ सेवेसाठी लायक असा आदर मिळावा याची खात्री केल्याबद्दल खेळाडूंनी पंतप्रधानांचे आभार मानले.
Sportspersons thanked PM for ensuring frontline health care workers&police personnel involved in this battle get respect they deserve for their selfless service.They talked about importance of discipline,mental strength, following fitness regimen and steps to boost immunity:PMO https://t.co/rbuxyNS7dI
— ANI (@ANI) April 3, 2020
यापूर्वीही पंतप्रधानांनी विविध क्षेत्रातील लोकांशी अशाच प्रकारे संवाद साधला आहे की जेणेकरून रोल मॉडेल अधिकाधिक लोकांना कोविड-19 सारख्या धोकादायक आजाराची जाणीव करून देऊ शकेल. शिवाय, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे या काळात पुढे जाऊन कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या सैनिक, वैद्यकीय कर्मचारींचे आभार मानले. पंतप्रधानांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्ससह संवाद साधला आणि ते म्हणाले की आश्चर्यकारक निष्ठेने रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांना ते सलाम करतात.