Paris Olympics (Photo Credit - X)

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची आज सांगता होत आहे. यंदाच्या ऑलिम्पिक (Paris Olympic)स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. परिणामी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदकांची कमाई केली. 9 ऑगस्ट रोजी कुस्तीमध्ये भारताला यंदाचे शेवटचे पदक मिळाले. ज्यामध्ये अमन सेहरावतने कांस्यपदक जिंकले. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे सहावे पदक होते. मात्र, यामुळे पदकतालिकेत भारताच्या स्थितीत पदक तालिकेत लक्षणीय सुधारणा झालेली नाही. पदकतालिकेत भारत 71 व्या स्थानी राहिला आहे. (हेही वाचा:Paris Olympics 2024: फक्त एक पदक असूनही पाकिस्तान पदकतालिकेत भारतापेक्षा वरच्या स्थानावर कसा? घ्या जाणून )

टोकयो ऑलिम्पिक 2018 मध्ये भारताने 7 पदक जिंकली होती. ज्यात 1 सुवर्ण, 2 रजत, 4 कांस्य पदक जिंकली होती. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये वेगवेगळ्या नेमबाजी स्पर्धांमध्ये 3 कांस्यपदके जिंकण्यात भारताला यश आले. 8 ऑगस्ट रोजी भारतीय हॉकी संघानेही कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले. (हेही वाचा:Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पैलवान अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव )

त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 5 वर पोहोचली होती. 5 ऑगस्ट रोजी भारताला कुस्तीमधील 57 किलो फ्री-स्टाईल स्पर्धेत अमन सेहरावतने आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. यानंतर भारताकडे एकून 6 कांस्य पदके झाली आहेत. 14 ऑगस्ट म्हणजेच स्पर्धेच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात होईपर्यंत पकदतालिकेत भारत 71 व्या स्थानी होता.

या ऑलिम्पिकमध्ये चीन आणि अमेरिकेन खेळाडूंची जादू दिसली आहे. पदकतालिकेत चीनने अव्वल स्थान पटकावले असून त्यांनी एकूण 90 पदके जिंकली आहेत. यात 39 सुवर्ण, 27 रजत आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेने सर्वाधिक 122 पदके जिंकूनही ते दुसऱ्या स्थानी आहेत. कारण अमेरिकेपेक्षा चीनकडे एक सुवर्णपदक जास्त आहे. यामध्ये एकूण 50 पदकांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे, तर जपान आणि फ्रान्स अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.