वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला मोठा धक्का; फायनलआधी दीपक पुनिया Out, ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले
दीपक पुनिया (Photo Credit: IANS)

जागतिक कुस्ती स्पर्धेतील भारताच्या आशांना मोठा धक्का बसला जेव्हा युवा कुस्तीपटू दीपक पुनिया ने 86 किलो गटातील अंतिम फेरीतून आपले नाव मागे घेतल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रविवारी 86 किलो गटातील अंतिम मॅचमध्ये पुनियाचा सामना इराणच्या हसन यज्दानिचिराती शी होणार होता, परंतु दुखापतीमुळे त्याला या सामन्यातून माघारी घ्यावी लागली. यासह नऊ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. 2010 मध्ये मॉस्को येथे सुशील कुमारने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकवून दिले होते. यापूर्वी, दीपकने सेमीफायनलमध्ये स्वित्झर्लंडच्या स्टीफन सेचमुथचा 8-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपकने ऑलिम्पिक कोटादेखील मिळविला आहे. (World Wrestling Championships: कुस्तीपटू बजरंग पुनिया ने जिंकले करियरचे तिसरे पदक, कुश्ती चॅम्पियनशिपमध्ये रवी कुमार दहिया सह जिंकले कांस्यपदक)

अंतिम सामन्यात पूनियाचा सामना इराणचा अनुभवी हजसन याझदानी याच्याशी होणार होता पण दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. सेमीफायनलमध्ये स्वित्झर्लंडच्या कुश्तीपटूविरुद्ध खेळताना दीपकच्या टाचेला दुखापत झाली होती, त्यामुळे तो अंतिम सामना खेळू शकला नाही. दीपकचा पहिल्या विश्वविजेतेपदाचा प्रवास रमणीय होता. मागील वर्षी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणारा दीपक यावर्षी अंतिम फेरी गाठणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू होता. तिथे त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या विजयासह देशासाठीचा चौथा ऑलिम्पिक कोटा जिंकला होता.

जागतिक कुश्ती स्पर्धेमध्ये भारताने आजवर एकूण एक सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्यपदक जिंकले आहेत. सुशीलशिवाय, 1968 मध्ये बिस्भर सिंगने रौप्य, दिल्लीत अनिल कुमार दहिया, 2010 मध्ये रौप्य, बजरंग पुनिया 2018 मध्ये बुडापेस्टमध्ये रौप्यपदक जिंकले. या व्यतिरिक्त, उदय चंद यांनी 1961 मध्ये योकोहामा येथे कांस्यपदक, बजरंगने 2013 बुडापेस्टमध्ये कांस्यपदक, 2009 मध्ये रमेश कुमार ने हेरनिंगमध्ये कांस्यपदक, 2015 लास वेगासमध्ये नरसिंह पंचम यादव यांनी कांस्य, 2019 मध्ये नूर सुलतान येथे रवि कुमार दहिया कांस्य आणि बजरंग यांनी कांस्यपदक जिंकले. बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे ज्याने तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकले आहे. त्याने एकदा रौप्य आणि दोन वेळा कांस्यपदक जिंकले आहेत.