भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने शुक्रवारी जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 65 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. बजरंगने कांस्यपदक मिळवण्यासाठी मंगोलियाच्या तुळगा ओचिर चा 8-7 असा पराभव केला. बजरंग सुरुवातीला 6-0 ने पिछाडीवर होता पण जोरदार पुनरागमन करत पदकावर आपले नाव कोरले. सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे निराश झालेल्या बजरंगने मंगोलियाच्या कुश्तीपटूचा 8-7 असा पराभव केला. सेमीफायनलमध्ये बजरंगचा 9-9 ने पराभव झाला आणि त्यानंतर त्याने पंचांवर संताप व्यक्त केला. याबाबत बजरंगचे गुरू आणि भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकणार्या योगेश्वर दत्त यानेदेखील नाराजी व्यक्त केली. बजरंग पाठोपाठ रवि कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya) याने 57 किलो वजनी गटात कांस्य जिंकले. (बॉक्सर अमित पांघळ याने रचला इतिहास, World Boxing Championships च्या फायनलमध्ये पोहचणारा बनला पहिला भारतीय)
कांस्यपदकांच्या सामन्याच्या सुरूवातीला बजरंग मागे होता. ओछिरने त्यांना बाहेर काढले, दोन गुण घेतले आणि नंतर 6-0 अशी आघाडी घेण्यासाठी चेस्ट थ्रोच्या माध्यमातून चार गुण घेतले. मात्र, बजरंगने दोन गुण घेत स्कोर 6-2 पर्यंत नेला. यानंतर बजरंगने सलग गुण मिळवून आपले गुण आठ वर वाढवले. येथे मंगोलियन खेळाडूने एक गुण मिळविला पण, बजरंगने आपली आघाडी कायम राखत कांस्यपदक आपल्या नावावर केले.
News Flash:
Ravi Kumar upsets reigning Asian Champion Reza Atri of Iran 6-3 to win Bronze medal (57kg) in World Wrestling Championships. #WrestleNurSultan pic.twitter.com/KyTmntUzhu
— India_AllSports (@India_AllSports) September 20, 2019
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन्ही कुस्तीपटूंनी यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक 2020 चे तिकीट कापले होते. एकीकडे बजरंगला पदकासाठी संघर्ष करावे लागले तर रविने सुरुवातीपासूच प्रतिस्पर्धीवर वर्चस्व बनवून ठेवले होते. बजरंगचे हा जागतिक कुस्ती स्पर्धेतिल तिसरे पदक आहे. 2013 मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते, पण तेव्हा तो 60 किलो वजनाच्या गटात खेळायचा. बजरंगने मागील वर्षी 65 किलो वजनी गटात पहिले रौप्यपदक जिंकले होते. अशाप्रकारे, बजरंग देखील जागतिक स्पर्धेत तीन तीन पदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू बनला.