बॉक्सर अमित पांघळ याने रचला इतिहास, World Boxing Championships च्या फायनलमध्ये पोहचणारा बनला पहिला भारतीय
अमित पंगाल (Photo Credit: IANS)

आशियाई चॅम्पियन भारताचा युवा बॉक्सर अमित पांघळ (Amit Panghal) याने शुक्रवारी इतिहास रचला. बॉक्सिंगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याने चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 52 किलोग्रॅम गटात सेमीफायनल मॅचमध्ये कझाकस्तानच्या साकन बिबिसनोव्ह चा 3-2 असा पराभव केला. शनिवारी अंतिम सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या शाखोबिदिन झिरोवचा सामना अमितशी होईल. शाखोबिदिन झिरोवने दुसर्‍या उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या बिलाल बेनामाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पंगालला या स्पर्धेत द्वितीय मानांकन मिळाले होते. दुसरीकडे, 63 किलो वजनी गडात मनीष कौशिक याला सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यावर कांस्य पदक मिळाले आहेत. कौशिकला अव्वल मानांकित क्यूबान अँडी गोमेझ क्रूझकडून 0-5 ने पराभव पत्करावा लागला.

पांघळ मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने चांगले काम करत आहे आणि त्याच्या यशाचा आलेख सातत्याने वरच्या बाजूस सरकत आहे. त्याच्या यशाची कहाणी 2017 च्या आशियाई चँपियनशिपमध्ये सुरू झाली जिथे त्याने 49 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. त्यानंतर त्याने 2019 मध्ये पदकाचा रंग बदलला आणि त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. यानंतर 49 किलोच्या ऑलिम्पिक कार्यक्रमातून माघार घेत त्याने 52 किलोच्या स्पर्धेत खेळण्याचे ठरवले.

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या एका टप्प्यात भारताने कधीही एकापेक्षा जास्त कांस्यपदक जिंकले नसले तरी अमित पन्हाळ आणि मनीष कौशिक सेमीफायनल फेरी गाठत इतिहास रचला आहे. यापूर्वी विजेंदर सिंगने 2009 मध्ये, 2011 मध्ये विकास कृष्णा, 2015 मध्ये शिव थापा आणि 2019 मध्ये गौरव बिधुरी यांनी कांस्यपदक जिंकले होते. दुसरीकडे, महिला गटात एमसी मेरी कॉमने शानदार कामगिरी करत विक्रमी 6 वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळवाल आहे. शनिवारी पांघळने सुवर्णपदक जिंकल्यास जागतिक स्पर्धेत स्वर्ण पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष बॉक्सर बनेल. पण, त्याला टोकियो ऑलिम्पिकसाथीचे तिकीट मिळणार नाही. कारण की, ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा नाही.