इंग्लंड (England) च्या धर्तीवर सध्या आयसीसी (ICC) विश्वकपची धूम आहे. मात्र, त्याच बरोबर इंग्लंडच्या विंबलडन (Wimbledon) गावात दरवर्षी परिमाणे टेनिस ग्रँड स्लॅम सुरु झाले आहेत. पहिल्या दोन दिवसाच्या खेळणे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. माजी लेडीज नंबर 1 नाओमी ओसाका (Naomi Osaka), वीनस विलियम्स (Venus Williams) पुरुषांमधील नंबर 5 डोमिनिक थिएम (Dominic Thiem) ही पहिल्या दोन दिवसात गारद झाले. याच मध्ये चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या विंबलडनमध्ये ब्रिटनचा अँडी मरे (Andy Murray) आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स (Serena Williams) मिश्र दुहेरीत सोबतीने खेळणार आहेत. मरे ने मंगळवारी या बाबतची घोषणा केली.
विंबलडन सुरु होण्याआधी मरेने आपण मिश्र दुहेरीसाठी योग्य पार्टनरच्या शोधात आहे असे जाहीर केले होते तर त्याला प्रतिसाद देताना सेरेनाने मला हरकत नाही अशी सकारात्मकता दाखवली होती.
दरम्यान, मरे नुकताच ढोपराच्या शस्त्रक्रियेनंतर मैदानावर परतला आहे. तो विंबलडनच्या पुरुष दूहेरी व मिश्र दुहेरीत सहभागी झाला आहे. पुरुष दुहेरीसाठी फ्रान्सचा पियरे ह्युजेस हर्बर्ट (Pierre-Hugues Herbert) हा मरेचा साथीदार आहे. दुसरीकडे, सेरेनाचा दुहेरीमधल्या कामगिरीबद्दल बोलण्याची गरज नाही. दुहेरीतही तिची कामगिरी चांगली आहे. ग्रास कोर्टवरचा तिचा खेळ प्रभावी आहे. महिला डबल्समध्ये सेरेनाच्या खात्यात 14 ग्रँड स्लॕम मिळवले आहे तर मिश्र-दुहेरी सेरेनाने दोनदा विजेतेपद मिळवले आहे तर दोनदा उपविजेती राहिली आहे.
महिला एकत्रीत सेरेनाने मंगळवारी जुलिया गॕटो मोंटीकोनवर सरळ सेटमध्ये विजयासह दमदार सुरुवात केली आहे. सेरेना 1998 च्या विंबलडन आणि युएस ओपन (US Open) मध्ये मॕक्स मिर्नी (Max Mirnyi) च्या जोडीने अजिंक्य ठरली होती.