पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज विनेश फोगटने सलग दोन सामने जिंकले आहे. महिलांच्या 50 किलो वजनी गटात क्युबाच्या युस्नेलिस गुझमनशी स्पर्धा करणार असलेल्या या स्टार खेळाडूकडे भारतीय कुस्ती चाहत्यांच्या आशा बांधल्या आहेत. यावेळी विनेशच्या ऑलिम्पिक प्रवासाला विशेष महत्त्व असून सर्वांच्या नजरा तिच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये विनेश फोगटची महिला 50 किलो कुस्तीची उपांत्य फेरी 6 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:15 वाजता सुरू होईल. पॅरिस ऑलिंपिक 2024 चे प्रसारण हक्क Sports18 कडे आहेत, जे Sports18 नेटवर्क चॅनेलवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा पर्याय प्रदान करेल.
चाहत्यांना JioCinema ॲप आणि वेबसाइटवर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्याचा पर्याय मिळू शकतो. डीडी स्पोर्ट्स चॅनल भारतीय प्रेक्षकांसाठी विनेश फोगटचा सामना थेट प्रसारित करेल. JioCinema वर तुम्हाला सामन्याचे थेट प्रवाह तसेच तपशीलवार कव्हरेज आणि रिअल-टाइम अपडेट्स मिळतील. (हेही वाचा - Paris Olympic 2024: विनेश फोगाटची युक्रेनच्या ओक्साना लिवाचवर मात; उपांत्य फेरीत मिळवला प्रवेश)
पाहा पोस्ट -
Indian wrestler Vinesh Phogat (50kg) enters semifinals of Olympic Games with 7-5 win over Ukraine's Oksana Livach
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2024
विनेश फोगटने आज अप्रतिम कामगिरी करत आहे. अवघ्या पाऊण तासात दोन सामने जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. लिवाचने खूप प्रयत्न केले पण शेवटी विनेशने आपली पकड मजबूत ठेवत विजय मिळवला. विनेशने उपांत्यपूर्व सामना 7-5 च्या फरकाने जिंकला. आता तिचा उपांत्य सामना आज रात्री 10.15 वाजता क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझशी होईल.