
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) भारतीय कुस्ती महासंघाने (Wrestling Federation of India) जागतिक स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी दिली आहे. फोगाटला 2020 टोकियो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) आल्यानंतर कथित शिस्तीसाठी WFI ने तात्पुरते निलंबित केले होती - जिथे ती भारताच्या (India) अव्वल पदकाच्या दावेदारांपैकी एक असूनही पदक जिंकू शकली नाही. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फोगाट आणि सोनम मलिक व दिव्या काकरन या दोन अन्य कुस्तीपटूंनाही WFI ने जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली आहे, पण कुश्ती महासंघने म्हटले की भविष्यात कुस्तीगीरांवर कोणतीही शिस्तभंगाची समस्या असल्यास ते आजीवन बंदी घालू शकते. WFI चे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांनी तीन कुस्तीपटूंना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की त्यांनी कुस्तीपटूंना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जर त्यांनी त्यांच्या चुका पुन्हा केल्या तर त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यास भाग पाडले जाईल.
फोगाट 2020 टोकियोमधून लवकर बाहेर पडल्यानंतर WFI ने तिला भारतीय खेळाडूंसह राहण्यास आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षण देण्यास नकार दिल्याबद्दल व तिच्या संघासाठी दिलेली अधिकृत संघाची जर्सी न घातल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. विनेश ने या नोटिशीला उत्तर देताना आपल्या चुकीबद्दल माफी मागितली होती. अहवालात पुढे म्हटले आहे की डब्ल्यूएफआय फोगाट तसेच इतर दोन कुस्तीपटूंना पुढील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी बंदी घालण्याची योजना आखत होती पण त्यांना आणखी एक संधी देण्यासाठी त्यांचे मत बदलले आहे. भारतीय कुस्ती महासंघ मात्र विनेश फोगाटने पाठवलेल्या उत्तरावर खूश नाही. विनेश आणि इतर दोन पैलवानांचे उत्तर समाधानकारक नव्हते असे महासंघाचे म्हणणे आहे, पण महासंघ या खेळाडूंना दुसरी संधी देऊ इच्छितो. कुस्ती महासंघाने स्पष्ट केले आहे की, विनेश फोगाटने भविष्यात इतर कोणतीही चूक केल्यास तिच्यावर आजीवन बंदी कारवाई केली जाऊ शकते.
टोकियो येथे आयोजित 2020 ऑलिम्पिक खेळात विनेश महिलांच्या 53 किलो वजनाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेता आणि सध्याची युरोपियन चॅम्पियन बेलारूसीयन वनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभूत झाली होती. दरम्यान जागतिक कुश्ती महासंघाच्या निर्णयानंतर नॉर्वेच्या ओस्लो येथे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुढील आठवड्यात तीनही कुस्तीगीर निवड ट्रायलमध्ये भाग घेण्यास पात्र ठरले आहेत.