लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाच्या मॅटुरिन शहरातील मोन्युमेंटल स्टेडियमवर ओल्या मैदानामुळे 30 मिनिटे उशीर झालेल्या सामन्यात व्हेनेझुएलाचा सामना 1-1 असा बरोबरीत रोखला. सॉलोमन रॉन्डनने दुसऱ्या हाफमध्ये बरोबरी साधली आणि व्हेनेझुएलाने त्यांच्या विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटिनाशी 1-1 अशी बरोबरी साधली. व्हेनेझुएलाचा गोलरक्षक राफेल रोमोने लिओनेल मेस्सीच्या फ्री-किकवर पंच मारल्यानंतर निकोलस ओटामेंडीने सहा-यार्ड बॉक्सच्या सिमारेषेवरून किक मारुन विद्यमान जगज्जेतेसाठी गोलची सुरुवात केली. (हेही वाचा - Rafael Nadal Announces Retirement: स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने केली निवृत्तीची घोषणा; Davis Cup Finals असेल शेवटची स्पर्धा )
व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यात बचावपटू निकोलस ओटामेंडीने 13व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी गोल केला. मेस्सीचा क्रॉस आणि गोलरक्षक राफेल रोमोच्या चुकीनंतर त्याने चेंडू रिकाम्या जाळ्यात टाकला. व्हेनेझुएलासाठी सॅलोमन रॉन्डनने 65व्या मिनिटाला हेडर करत बरोबरी साधली. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील एकमेव संघ आहे जो अद्याप विश्वचषक स्पर्धेत खेळलेला नाही.
दरम्यान नऊ सामन्यांनंतर 19 गुणांसह 10 संघांच्या दक्षिण अमेरिकन पात्रता फेरीत अर्जेंटिना अव्वल स्थानावर आहे. बोलिव्हियाकडून 1-0 ने पराभूत होऊनही कोलंबियाचे 16 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत. उरुग्वे 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर ब्राझीलचे 13 गुण आहेत.