US Open 2020: भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉ मध्ये मिळाला प्रवेश; रोजर फेडरर, राफेल नडालची माघार
सुमित नागल (Photo Credit: Instagram)

31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ग्रँड स्लॅममधून अनेक अव्वल खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर युवा भारतीय टेनिसपटू सुमित नागलची (Sumit Nagal) यूएस ओपन (US Open) एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट एंट्री झाली आहे. 128 खेळाडूंपैकी थेट प्रवेश मिळवणारा जगातील 127 व्या क्रमांकाचा सुमित शेवटचा खेळाडू होता, स्पर्धेच्या वेबसाइटनुसार ताज्या एटीपी क्रमवारीचा (ATP Rankings) वापर करून निश्चित करण्यात आले. पुरुषांच्या क्षेत्रातील नागल एकमेव भारतीय आहे. 132 व्या स्थानावर असलेल्या प्रजनेश गुन्नेस्वरनला (Prajnesh Gunneswaran) मात्र थेट प्रवेश मिळवता आला नाही. मागच्या वर्षी नागालने आपले सर्व पात्रता फेरी जिंकून येथे आपला पहिला ग्रँड स्लॅम मुख्य ड्रॉ गाठली आणि पहिल्याच फेरीत दिग्गज रोजर फेडररचा (Roger Federer) सामना केला. बहुप्रतिक्षित संघर्षात झज्जरच्या 22 वर्षीय युवकाला फेडररविरुद्ध 6-6, 1-6, 2-6, 4-6 ने पराभवाला सामोरे जावे लागले. फेडररविरुद्ध नागलने एक सेट जिंकला. (US Open 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नंबर 1 अ‍ॅश बार्टीची पीछेहाट)

अव्वल स्थानावर असलेला नोवाक जोकोविचसह डोमिनिक थिम, डेनियल मेदवेदेव, स्टेफानोस त्सितिपास आणि अलेक्जेंडर ज्वेरेव यंदा स्पर्धेत सहभागी होतील. फेडरर आणि राफेल नडालच्या जोडीसोबत स्पर्धेतून माघार घेण्याचे जाहीर केले. फेडररने यावर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे सर्व स्पर्धेतून माघार घेतली आहे, तर कोविड-19 मुळे गरजेता नडालने माघार घेतली. माजी चॅम्पियन स्टॅन वावरिंका, निक किर्जियोसनिक किर्जियोस, फेबियो फोग्निनी आणि गेल मोनफिल्स या इतर खेळाडूंनी देखील स्पर्धेतून बाहेर राहणे पसंद केले. नगलने जर्मनीहून पीटीआयला सांगितले की, “ग्रँड स्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये पुन्हा प्रवेश करणे चांगले आहे. मी आत्तापर्यंत फक्त एकदाच खेळलो आहे, परंतु समजून घ्या की यावर्षी अशी परिस्थिती नाही. मी झेक प्रजासत्ताकमध्ये चॅलेन्जर स्पर्धा खेळावर अमेरिकेत जाईन.’’

तो म्हणाला, ‘‘मला जास्त अपेक्षा नाहीत. मला फक्त माझ्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे.” त्याने सांगितले की न्यूयॉर्कमध्ये त्याला क्वारंटाइन राहावे लागणार नाही. तो म्हणाला, ‘‘आम्हाला जैव-सुरक्षित क्षेत्रात राहायचे आहे. आम्ही हॉटेलमधून कोर्टात जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, प्रत्येक इतर दिवशी एक कोरोना टेस्ट केली जाईल.’’ या आठवड्यात इटलीमध्ये पलेर्मो लेडीज ओपन येथे महिलांसाठी खेळण्याचा खेळ सुरू असल्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे मार्चपासून ठप्प झालेलेव्यावसायिक टेनिस टूर्स पुन्हा सुरु झाले आहेत.