Novak Djokovic (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण विश्वाला हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. सर्वसामान्यांसह राजकीय नेते, खेळाडू, कलाकारदेखील कोरोनाच्या जाळ्यात अकडत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिडाविश्वातून खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याला कोरोनाची लागण झाली आहे. नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. येथील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नोवाकची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांनतर आज त्याचा कोरोनाचा अहवाला आहे. ज्यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोना विषाणूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी जोकोविच एड्रिया टूरमुळे चर्चेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नोवाकच्या पत्नीचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महत्वाचे म्हणजे, नोवाकच्या मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. बेलग्रेड येथे पोहोचताच आम्ही करोना चाचणी केली असताना माझा आणि पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने मुलांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आहे, असे नोवाक म्हणाला आहे. नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. येथील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नोवाक क्रोएशियाला निघून गेला होता. यानंतर त्याने आपली चाचणी केली होती. हे देखील वाचा- Pakistan Cricketers Test Positive For Covid19: इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका; मोहम्मद हाफिज, वहाब रियाज यांच्यासह आणखी 7 जणांना कोरोनाची लागण

ट्विट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगभरात 92 लाख 43 हजार 221 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 75 हजार 609 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 49 लाख 82 हजार 535 जणांनी कोरोनावर मात केली आहे.