भारतीय महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल (Photo Credit: Facebook)

सोमवारी भारताने स्ट्रायकर राणी रामपालला (Rani Rampal) राष्ट्रीय महिला हॉकी संघाची (Indian Hockey Team) कर्णधार आणि दीप ग्रेस एक्का व सविता यांची आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उप-कर्णधारपदी निवडले आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान टोकियो येथे ऑलिम्पिक  (Tokyo Olympics) स्पर्धांचे आयोजन होणार आहे. तसेच राणीची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धे असणार आहे. यापूर्वी 36 वर्षांनंतर 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवलेल्या भारतीय हॉकी संघाची ती सदस्य होती.