Tokyo Olympics 2020 Updates: महिला हॉकीच्या सुरुवातीच्या खेळात नेदरलँडने भारताला केले 5-1 ने पराभूत
भारतीय महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल (Photo Credit: Facebook)

महिला हॉकी पूल अ च्या पहिल्या सामन्यात नेदरलँडने भारताला एका गोलविरूद्ध 5 गोलांनी पराभूत केले. भारताकडून कर्णधार राणीने एकमेव गोल केला. पहिल्या तीन क्वार्टरसाठी स्कोअर 1-1 असा बरोबरीचा होता. पण नंतर नेदरलँड्स संघाने दणदणीत पुनरागमन केले आणि सलग चार गोल करून स्कोअर 5-1 वर नेला.