India At Tokyo Olympics 2020: भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आज लंडन ऑलिम्पिक (London Olympics) खेळातील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने (Team India) सर्वात चांगली कामगिरी करत 6 पदके जिंकली होती. त्यानंतर आता 2021 मध्ये टोकियोमध्ये भारताने एक सुवर्ण पदाकासह एकूण सात पदके जिंकत, लंडन ऑलिम्पिक पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. खेळाच्या 15 व्या भारतासाठी बजरंग पुनियाने कांस्य तर भालाफेकीपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ऐतिहासिक सुवर्ण पदकाची कमाई केली. टोकियो खेळात भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा 127 खेळाडूंचा दल पाठवला होता. यापैकी अनेकांनी विशेषतः महिला खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रत्येकाच्या मनावर ठसा उमटवला. 2021 लंडन ऑलिम्पिक खेळात टीम इंडियाने 2 रौप्य व 4 कांस्य पादकांसह एकूण सहा पदके जिंकली होती तर यंदाच्या टोकियो खेळात एकूण सात पदके खिशात घातली आहेत. (Tokyo Olympics 2020: अभिमानास्पद! नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये फडकावला तिरंगा, पाहा जेव्हा पोडियममध्ये गुंजले भारताचे राष्ट्रगीत Watch Video)
टोकियो ऑलिम्पिक खेळात आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये मीराबाई चानू (रौप्य), पीव्ही सिंधू (कांस्य), लवलीना बोर्गोहेन (कांस्य), भारतीय पुरुष हॉकी संघ (कांस्य), रविकुमार दहिया (रौप्य), बजरंग पुनिया (कांस्य) आणि नीरज चोप्रा (सुवर्ण) यांचा समावेश आहे. जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक खेळाच्या एकूण 18 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते.नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 87.58 मीटर थ्रोसह पुरुषांच्या भालाफेकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. अभिनव बिंद्रा (नेमबाजी) नंतर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी वैयक्तिक गोल्ड जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.
दुसरीकडे, राणी रामपालच्या महिला हॉकी संघाने देखील आपल्या तिसऱ्या ऑलिम्पिक खेळात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सांगणे पहिल्या तीन पराभवांना मागे ठेवत पुढील तीन सामने जिंकून पहिल्यांदा सेमीफायनल फेरी गाठली. पण तिथे त्यांना अर्जेंटिना संघाकडून पराभवाचे तोंड पाहावे लागे आणि पहिल्यांदा ऑलिम्पिक हॉकी फायनल खेळण्याचे स्वप्न भंग झाले. त्यानंतर कांस्यपदकाच्या सामन्यात गतविजेत्या ग्रेट ब्रिटनने त्यांच्यावर मात केली ज्यामुळे त्यांचे पहिले ऑलिम्पिक पदक देखील थोडक्यात हुकले. राणी रामपाल आणि संघ ऑलिम्पिकमध्ये यंदा पदक जिंकू शकले नसले त्यांनी कोट्यवधी देशवासीयांची मने जिंकली आहेत. देशातील प्रत्येक क्रीडाप्रेमी त्यांच्या विजयासह पराभवात देखील त्यांच्या सोबत राहिला. पुरुषांसह महिला खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीनंतर आता त्यांच्याकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा वाढल्या आहेत.
शिवाय, गोल्फमध्ये देखील अदिती अशोकने शानदार कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले. अनपेक्षित अशा गोल्फ खेळात पदकाची आशा उंचावणाऱ्या अदितीला अंतिम क्षणी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.