Tokyo Olympics 2020 India Schedule: टोकियो ऑलिम्पिकचे (Tokyo Olympics) आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत केवळ एक रौप्य पदक भारताच्या खात्यात आले आहे. ऑलिम्पिक खेळाचा सातवा दिवस भारतासाठी (India) मिश्र ठरला. एकीकडे 23 वर्षीय लवलिना बोर्गोहेन हिने बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी एक पदक निश्चित केले तर आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीला उपांत्यपूर्वी फेरी सामन्यात पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आठव्या दिवशी भारताला पदक जिंकून देण्याच्या निर्धाराने पीव्ही सिंधू (PV Sindhu), अताणु दास (Atanu Das) यांच्यासह अनेक खेळाडू उद्या मैदानात उतरतील. या खेळाडूंकडूनही संपूर्ण देशाला मोठ्या आशा आहेत. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी माहिती जाणून घेऊया. (Tokyo Olympics 2020: पीव्ही सिंधू ऑलिम्पिक पदका नजिक, जपानच्या Akane Yamaguchi हिचा पराभव करुन सेमीफायनल फेरीत प्रवेश)
ऑलिम्पिक खेळांच्या आठव्या दिवशी उद्या भारतीय खेळाडूंचे प्रमुख सामने होणार आहे. विश्वविजेता पीव्ही सिंधूपुढे सेमीफायनल सामन्यात चिनी तायपेईची ताई जु-यिंग हिचे आव्हान असणार आहे तर बॉक्सर अमित पंघाल आपल्या राऊंड ऑफ 16 सामन्यासाठी रिंगमध्ये उतरेल. महिलांच्या 50 मीटर रायफल तीन पोझिशन्समध्ये भारताच्या तेजस्विनी सावंत आणि अंजुम मुद्गील आव्हान देण्यासाठी सज्ज असतील. यापूर्वी भारतीय नेमबाजांनी टोकियो खेळांमध्ये निराशाजनक कामगिरी बजावली आहे. त्यामुळे तेजस्विनी व अंजुम मुद्गीलकडून देशाला मोठ्या अपेक्षा असतील. तसेच बॉक्सर पूजा राणी आणि तिरंदाज अतनू दास देखील दिवसाच्या सुरुवातीला पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी उत्सुक असतील. पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या Li Qian हिचा सामना करेल.
It's going to be an action packed day for #TeamIndia tomorrow, 31st July at #Tokyo2020
Stay tuned for updates and keep encouraging your favourite athletes with #Cheer4India messages pic.twitter.com/mOOGdVi2tJ
— SAIMedia (@Media_SAI) July 30, 2021
शिवाय, भारतीय महिला हॉकी टीम पुढच्या फेरीत स्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने उद्या दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध पूल A सामना खेळण्यास मैदानात उतरेल. यापूर्वी सलग तीन पराभवानंतर महिला संघाने आयर्लंडविरुद्ध गटातील चौथ्या सामन्यात 1-0 असा विजय मिळवला व खेळात आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. अशास्थितीत राणी रामपालच्या हॉकी संघासाठी पुढील सर्व सामने जिंकणे गरजेचे असणार आहे.