Indian Women's Hockey Team | (Photo Credits: Hockey India)

भारतीय महिला हॉकी संघ (Indian Hockey Team) पुरुष हॉकी संघाप्रमाणेच टोक्यो ओलंपिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवेल, अशी शक्यता असतानाच ती रंजकपणे मावळली. भारताचा इंग्लंड महिला हॉकी संघाकडून 3-4 अशा फरकाने पराभव झाला. भारताने सामना तर गमावला. त्यासोबतच पदक मिळण्याची शक्यताही मावळली. दरम्यान, भारताने सामना गमावला असला तरी, गुरजीत कौर (Gurjit Kaur) आणि वंदना कटारिया (Vandana Katariya) या दोन खेळाडूंनी केलेल्या गोलची जोरदार चर्चा आहे. या दोघींनी ज्या पद्धतीने गोल केले त्यामुळे त्या अनेकांकडून कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. सामन्यादरम्यान या दोघींनी प्रत्येकी एक गोल केला. ज्यामुळे भारताचे पारडे इंग्लंडच्या बरोबरीत आले. या दोघींच्या गोलमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवीत झाल्या.

गुरजीत हिने भारताच्या वतीने पहिला गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून केला. त्या वेळी भारती संघ 2-0 अशा पिछाडीवर होता. गुरजीत हिने अत्यंत चपळाईने आणि कठीण समयी पेनल्टीच्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत गोल केला आणि संघातील खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले. लगेच त्यापाठोपाठ गुरजीत कौर हिने गोल केला. गुरजीत कौर हिचा गोलही पेनल्टी कॉर्नरवरुनच केला गेला. दोन्ही गोल भारतीय हॉकी संघाचे मनौधैर्य उंचावण्यात महत्त्वाचे ठरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत आणि इंग्लंड बरोबरीत आले. (हेही वाचा, Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमधील चुरशीच्या हॉकी सामन्यात महिला संघाचा परभव, कांस्य पदकाचे स्वप्न भंगले)

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

तिसऱ्या क्वार्टरमध्ये वंदना कटारीया हिने जोरदार खेळीचे दर्शन घडवत आणखी एक गोल केला. हा गोल इतका अचुक होता की काही काळ इंग्लंडच्या खेळाडूही स्तिमीत झाल्या. वंदनाच्या या गोलची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. वंदनाच्या गोलमुळे इंग्लंडविरुद्ध खेळताना हॉकी संग पुन्हा एकदा नव्या उत्साहासह पुनरागमन करु शकला. ज्यामुळे भारत आणि इंग्लंड संघ 3-3 अशा बरोबरीत आले. त्यानंतर इंग्लंडने चौथा गोल केला. हा गोल पेनर्टी कॉर्नरमधून झाला. इंग्लंड 4 आणि भारत 3 अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मात्र सामन्याची दिशाच बदलली. पुढे सामना संपला तेव्हा 3-4 अशा फरकाने भारताचा पराभव झाला. भारताचा पराभव झाला असला तरी आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.