Tokyo Olympics 2020: विश्वविजेता ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा 1-0 असा पराभव करून राणी रामपालच्या भारतीय महिला हॉकी संघाने (India Women's Hockey Team) टोकियो (Tokyo) येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक खेळात इतिहास रचला आहे. भारत महिला संघाने (India Women's Team) ऑलिम्पिक खेळात पहिल्यांदा सेमीफायनल फेरी गाठली आहे. भारतीय संघाचा विजयी क्षण पाहून प्रत्येक भारतीय नक्कीच गर्वानवीत झाला असेल. पण जसा सामना संपला आणि टीम इंडियाच्या (Team India) विजयाची घोषणा झाली तेव्हा एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंचे डोळे पाणावले तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने विजयाचा जल्लोष साजरा केला. गुरजीत कौरचा (Gurjeet Kaur) एकमेव गोल आणि उत्कृष्ट डिफेन्सच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. (Tokyo Olympics 2020: भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाचे आव्हान धुडकावून सेमीफायनल फेरीत मारली धडक)
गुरजीतने 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर निर्णायक गोल केला. यानंतर भारतीय संघाने गोल वाचवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली, ज्यामध्ये ते यशस्वीही झाले. गुरजीत कौरचा एकमेव गोल टीम इंडियासाठी ब्रह्मास्त्र ठरला ज्याच्या बळावर संघाने इतिहास घडवला. गोलरक्षक सविताने उत्तम कामगिरी बजावली आणि बाकी डिफेंडर्सनी तिला चांगली साथ दिली. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने अखेर प्रभावी कामगिरी 1980 मध्ये केली होती. त्या वेळी संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होता तर यंदा राणी रामपालच्या नेतृत्वातील संघाने पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. भारतीय हॉकी संघाने त्यांच्या पूलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडला हरवून चौथे स्थान पटकावले, तर ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या पूलमध्ये अव्वल स्थान पटकावले. पाहा भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचा तो क्षण:
History created#hockeyindia #Hockey#INDvsAUS #OlympicGames #Olympics2020 pic.twitter.com/pQNnTthAqZ
— Md Zeeshan (@Iluvshaan) August 2, 2021
विशेष म्हणजे केवळ तिसऱ्यांदा भारतीय संघ ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला आहे आणि तिसऱ्यांदा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित केला आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने आता त्यांना पदक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. आता फायनलच्या टीम इंडियाचा पुढील सामना बेल्जियमशी होईल.