Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिकच्या समापन सोहळ्यात भारतीय दलाची उत्सुकता शिगेला, बजरंग पुनियाने उंचावला भारताचा तिरंगा (See Photos)
टोकियो ऑलिम्पिक 2020 समापन सोहळा (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: टेकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 खेळाचा आज अंतिम दिवस पार पडला. आज सर्व देश ऑलिम्पिक व्हिलेजमधून मायदेशी परततील आणि नंतर 2024 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भेटतील. टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा टोकियोच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये सध्या सुरु असून भारताचा कुश्ती कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने (Bajrang Punia) स्टेडियममध्ये भारताचे (India) नेतृत्व करत तिरंगा उंचावला. सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय दल (Indian Contingent) खूप आनंदी दिसत होते. भारताच्या दृष्टिकोनातून हे ऑलिम्पिक ऐतिहासिक ठरले कारण या खेळांमध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली. भारताने एकूण सात पदके मिळवली. भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदकांचा चार दशकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये देशाचे पहिले सुवर्णपदक पटकावले. (Tokyo Olympics Closing Ceremony: टोकियो ऑलिम्पिक समापन समारंभा दरम्यान पॅरिसमध्ये आहे असे वातावरण, फ्रेंच शहरात होणार 2024 खेळांचे आयोजन)

दुसरीकडे, काही खेळाडूंचे पदक थोडक्यात हुकले. यामध्ये 23 वर्षीय महिला गोल्फर अदिती अशोक आणि भारतीय महिला हॉकी संघाचे नाव आहे. यासह आज टोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांचे आयोजन संपुष्टात आले आहे आणि आता प्रत्येकाचे लक्ष 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांकडे असेल. फ्रान्सची राजधानी पॅरिसकडे धुरा सोपवली जाईल. टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या समापन समारंभात ऑलिम्पिक स्टेडियममधून फटाक्यांनी संपूर्ण आकाश उजळून निघाले. मात्र, ऑलिम्पिक स्टेडियममध्ये नेत्रदीपक प्रकाश प्रदर्शन, फटाके आणि नंतर ऑलिम्पिक रिंग्जचे प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्व देशांचे ध्वजधारक आपापल्या देशाचा ध्वज घेऊन स्टेडियममध्ये उतरले. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समापन सोहळ्यात देखील ग्रीस देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला कारण ग्रीसमध्ये ऑलिम्पिकचा जन्म झाला आहे.

पॅरिस 2024

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक पदक पालिकेत अमेरिकेने 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्य यासह एकूण 113 पदके जिंकली, तर चीनने 28 सुवर्ण, 32 रौप्य आणि 18 कांस्यसह एकूण 88 पदकांची कमाई केली आहे. तसेच यजमान जपानच्या खात्यात 58 पदके आली, ज्यात 27 सुवर्ण, 14 रौप्य आणि 17 कांस्य पदक पटकावले आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 पदके जिंकली. यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये झाली जिथे त्याने 6 पदके जिंकली होती.