Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना दिले Anti-Sex Beds? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या बातमी मागील सत्य
Tokyo Olympics Beds (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही दिवसांत टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) खेळाला सुरुवात होणार आहे. याआधी अनेक महिने या स्पर्धेविषयी चर्चा सुरु आहे. आता जगभरातील खेळाडू जपानमध्ये दाखल झाले असून, खेळांपूर्वी खेळाडूंच्या बेड्सबाबत चर्चा रंगू लागली आहे. यंदा समितीने खेळाडूंना ‘अँटी-सेक्स बेड्स’ (Anti-Sex Beds) दिले असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान सामाजिक अंतराचे पालन व्हावे म्हणून हे खास प्रकारचे बेड्स बनवण्यात आले आहेत. अमेरिकन स्प्रिंटर पॉल चेलिमो याने बेड्सची छायाचित्रे शेअर केली असून, त्याने लिहिले आहे की- 'टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बसविण्यात आलेले हे बेड्स आहेत. खेळाडूंमधील जवळीक टाळण्यासाठी हे खास बेड्स बनवले आहेत.'

ऑलिम्पिकमध्ये ऐंशीच्या दशकात प्रथमच फार मोठ्या प्रमाणात सेक्स घडल्याची चर्चा होती. त्यानंतर लैंगिक आजारांपासून बचाव करण्यासाठी खेळाडूंमध्ये कंडोमचे वितरणही करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक वेळी ऑलिम्पिकमध्ये संयोजकांनी किती कंडोम वाटले गेले याची चर्चा होत असते. रिओ ऑलिम्पिक दरम्यान आयोजक देश ब्राझीलने सुमारे 9 दशलक्ष कंडोमचे वाटप केले होते.

तर, अँटी-सेक्स बेड हे कार्डबोर्डपासून बनविले गेले आहेत. ते अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहेत की त्यावर एका वेळी फक्त एकच व्यक्ती झोपू शकेल. जर एक किंवा दोनपेक्षा जास्त लोक यावर झोपले किंवा तसा प्रयत्न केला तर हा बेड तुटू शकतो. हा बेड दोन व्यक्तींचे वजन पेलू शकणार नाही. यासह बेडवर अधिक जोर लावल्यासही तो तुटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या बेडवर सेक्स करणे शक्य होणार नाही. (हेही वाचा: Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून विक्रमी संख्येत खेळाडूंची निवड, टोकियो येथील पदकांच्या दावेदारांबाबत घ्या जाणून)

याउलट टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमधील हे ‘कार्डबोर्ड बेड्स’ अतिशय दणकट असल्याचे आयरिश खेळाडू Rhys McClenaghan याने सिद्ध करून दाखवले आहे. यासाठी Rhys McClenaghan ने या बेडवर जोरात उड्या मारून दाखवल्या आहेत. त्याने इतका जास्त प्रमाणात दाब देऊनही हा बेड तुटला नाही. अधिकृत ऑलिम्पिक ट्विटर अकाऊंटने Rhys McClenaghan चा हा व्हिडिओ पोस्ट करत, बेड्सबाबत सत्य मांडल्याने धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, बेड बनविणारी कंपनी एअरवेव्ह दावा करते की, त्यांनी पर्यावरणाची सुरक्षा लक्षात घेऊन असे बेड्स बनवेल आहेत. कंपनीने असे सुमारे 18 हजार बेड्स तयार केले आहेत, जे ऑलिम्पिक दरम्यान खेळाडूंना आणि संघाला देण्यात येतील.