China Open 2019: वर्ल्ड चॅम्पियन जोडीला पराभूत करत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रंकीरेड्डी ने गाठले सेमीफायनल, आता No 1 जोडीचे आव्हान
सात्विकसाईराज-चिराग शेट्टी (Photo Credit: @bwfmedia/Twitter)

भारताची अव्वल क्रमांची पुरुष दुहेरीची जोडी, सातवीसैराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी शुक्रवारी चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत प्रवेश करून बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर 750 स्पर्धेत भारताचे आव्हान कायम ठेवले आहेत. भारताच्या या जोडीने 2018 विश्वविजेते ली जून हुई (Li Jun Hui) आणि लिऊ यू चेन ( Liu Yu Chen) यांचा 43 मिनिटांत 21-19, 21-15 असा पराभव केला. शनिवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिराग यांचा सामना अव्वल मानांकित आणि जगातील अव्वल मानांकित इंडोनेशियाची जोडीशी होणार आहे. मागील महिन्यात फ्रेंच ओपनच्या (French Open) अंतिम सामन्यात नववे मानांकित प्राप्त भारतीय जोडी इंडोनेशियन जोडीकडून पराभूत झाली होती.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दोन्ही जोडींमध्ये चुरशीची झुंज पाहायला मिळाली, पण अखेर सात्विक आणि चिरागने तिसर्‍या मानांकित चिनी जोडीला हरवण्यात यशस्वी ठरले. पहिल्या गेमअखेरीस दोन्ही जोड्या बरोबरीत होत्या, तर दुसर्‍या गेममध्ये एका वेळी स्कोअर 15-15 असा होता. चीनी खेळाडूंच्या काही चुकांचा फायदा सात्विक आणि चिरागने घेतला आणि सलग सहा गुण मिळवून सामना जिंकला. या दोन जोडींमध्ये आजवर तीन सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी सात्विक-चिरागने दोनदा, तर चिनी जोडीने फक्त एक विजय मिळवला आहे.

सात्विक आणि चिरागची जोडी ही स्पर्धेतील भारताची शेवटचे खेळाडू आहेत. यापूर्वी साई प्रणीत, परुपल्ली कश्यप, सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू आपापल्या सामन्यात पराभूत होत स्पर्धेतून बाहेर पडले. पुरुष एकेरीत भारताच्या आशा दुसर्‍या फेरीत संपल्या आणि महिला एकेरीत भारतीय आव्हानाचा पहिल्या फेरीत संपुष्टात आले. कश्यपचा डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन याने 21-13, 21-19असा पराभव केला, तर डॅनिश खेळाडू अँडर्स अँटोनसेनने 20-22, 22-20, 21-16 बी सई प्रणीतची मोहीमही रोखली.