Ramesh Pokhriyal Nishank | (Photo Credits: Facebook)

देशातील युवा शक्ती विचारत घेता खेळांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर आहे. अशा स्थितीत देशी खेळ लोकप्रिय बनविण्यासाठी स्वदेशी खेळांचे ग्रामीण ऑलिम्पिक (Rural Olympics) भरवण्याचा मानस शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांनी व्यक्त केला आहे. 'फिट इंडिया अभियान' (Fit India Movement) यंदा दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी बोलताना डॉ. रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, केंद्रीय शिक्षण मंत्रालय एवं क्रीडा मंत्रालय देशी खेळांना उत्तेजन देण्यासाठी ग्रामीण ऑलिम्पिक आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी गुजरात आणि पंजाबच्या धर्तीवर एक मॉडेलव आधारीत योजना राबवण्याचा विचार आहे, असेही निशंक यांनी सांगितले. (हेही वाचा, स्मृती खेळांच्या: दुर्मिळ होत चाललेला 'विटी-दांडू')

निशंक यांनी पुढे बोलताना सांगितले की, नागरिकांच्या आरोग्यासाठी तंदुस्ती अधिक महत्त्वाची आहे. त्यामळे आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात तंदुरुस्तीचे महत्त्व पटावे यासाठी फिट इंडिया हे अभियान राबवले जात आहे. जर आपले मन चांगले असेल तर त्यात चांगले विचार येतात. जर चांगले विचार आले तर कोणताही व्यक्ती चांगलेच काम करेन आणि यशोशिखरावर पोहोचेन असेही निशंक या वेळी म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. निशंक यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षांपासून फिट इंडिया अभियानाच्या माध्यमातून क्रीडा विभागाने देशभरातील अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. ज्यामध्ये देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या फिट इंडिया विकमध्ये देशभरातून 3,30,834 शाळानी सहभाग नोंदवला. यात 4,03,74147 विद्यार्थ्यंचा समावेश आहे.

देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जर खरोखरच ग्रामीण ऑलिम्पिकचे आयोजन केले तर त्याचा देशभरातील युवकांना फायदा होईल. तसेच, विदेशी खेळांपुडढे अडगळीत पडलेले आणि मार्केटींग प्रणाली वापरण्यात कमी पडल्याने विशेष महत्त्व न मिळू शकलेल्या खेळांना पुन्हा एकदा नवे दिवस येण्याची शक्यता आहे.