नुकताच जागतिक बॅडमिंटनचे जेतेपद जिंकणारी पीव्ही सिंधूला (PV Sindhu) मोठा धक्का बसला आहे. भारतीय एकेरी बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्युन (Kim Ji Hyun) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. किमनी वैयक्तिक करणं संघात पदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण कोरियाची किम मागील चार महिन्यांपासून सिंधूबरोबर काम करत होती. जगातील पाचव्या क्रमांकाची सिंधूला विश्वविजेते बनविण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सिंधू पुढे आहे कोरिया ओपन (Korea Open) मध्ये खेळणार आहे. या स्पर्धे आधी किमचे पद सोडणे सिंधूसाठी मोठा धक्का मानले जात आहे. या स्पर्धेसह या हंगामातिल पाहिजे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर (BWF World Tour) जेतेपद मिळवण्याच्या निर्धारित असेल. (Padma Awards 2020 Nominations’ List: Mary Kom ला पद्मविभूषण, PV Sindhu च्या नावाची पद्म भूषण साठी शिफारस)
दरम्यान, काही आठवड्यापूर्वी किमच्या पतीची तब्येत बिघडल्यामुळे तिला न्यूझीलंडला परतावे लागले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार किमच्या पतीला सहा महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात त्याची देखभाल करण्याची गरज आहे. शिवाय, एक शास्त्रक्रियासुद्धा करावी लागू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबाला किमची गरज असेल असं महंत किमने तिला परत येणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे. तसेच, किमच्या अनुपस्थितीमुळे कोच पुलेला गोपीचंद यांच्यावरचा भार वाढणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी जास्त वेळ उरलेला नाही आणि त्यामुळे बॅडमिंटन असोसिएशनसमोर किमच्या जागी दुसऱ्या प्रशिक्षकाची निवड करण्याचं आव्हान आहे.
दुसरीकडे, आजपासून कोरिया ओपनची सुरुवात होत आहे. स्वित्झर्लंडमधील विश्व जेतेपद मिळवल्यावर सिंधूला चायना ओपनच्या दुसर्या फेरीत त्यांचा पराभव करावा लागला. तो पराभव विसरून सिंधू स्पर्धेला नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सिंधूचा सामना अमेरिकेच्या बीवन झांगशी होईल. पाचव्या मानांकित सिंधूने कारकीर्दीतिल मागील आठ सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत 11 व्या झांगचा 5 वेळा पराभव केला आहे. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही झांगचा पराभव केला होता. सिंधूने 2017 मध्ये कोरिया ओपनचे जेतेपद मिळवले होते. आणि यंदा दुसऱ्यांदा हा मान मिळवण्याच्या प्रयत्नात ती असेल.