Paris Olympics Lifts Intimacy Ban: पॅरिस ऑलिम्पिकने कामक्रीडेवरील बंदी उठवली, खेळाडूंना दिले 300,000 कंडोम

ऑलिम्पिक व्हिलेजचे संचालक लॉरेंट मिचॉड म्हणाले की 2024 पॅरिस गेम्ससाठी, ते कामक्रीडेवरील बंदी उठवत आहेत आणि त्यांच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या 14,250 ऍथलीट्ससाठी 300,000 कंडोम उपलब्ध करुन दिले आहेत. ऑलिम्पिक व्हिलेजचे संचालक म्हणाले, "खेळाडूंचा आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे, 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी कोविड-19 साथीच्या आजारामुळे क्रामक्रीडेवर बंदी घालण्यात आली होती. ऍथलीट्सच्या एकमेकांच्या शारीरिक संबंधावर निर्बंध आणले होते,रोगाचा प्रसार रोखण्यासाठी इतरांपासून साडेसहा फूट अंतर ठेवावे, असे सांगितले होते." (हेही वाचा - ILCA World Championship: विष्णू सरवणनने नौकानयनात भारताचा पहिला पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकला)

"ॲथलीट्स कमिशनसोबत काम करताना, आम्हाला अशी काही ठिकाणे तयार करायची होती जिथे खेळाडूंना उत्साही आणि आरामदायी वाटेल," असे मिचाऊड यांनी सांगितले. तसेच ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मद्य उपलब्ध होणार नसून मात्र पॅरिसमध्ये ते उपलब्ध असल्याचे देखील त्यांनी सांगितले.  "आमच्याकडे जागतिक खाद्यपदार्थांसह 350 मीटर पेक्षा जास्त बुफे असतील... आणि मला खात्री आहे की येथे काही फ्रेंच पदार्थ मिळाल्याने खेळाडूंना खूप आनंद होईल." ऑलिम्पिकच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात खर्चिक ऑलिम्पिक असणार आहे. पॅरिसमध्ये जुलै स्पर्धेला सुरुवात होणार असून सुमारे $2.1 अब्ज खर्च होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकसाठी कंडोमचे वितरण करणे ही एक परंपरा आहे. 1988 च्या सोल ऑलिम्पिकपासून, आयोजकांनी एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी गर्भनिरोधक दिले होते. 2020 च्या खेळादरम्यानही 150,000 कंडोमचे वाटप करण्यात आले.